Israel-Hamas War: इस्रायलचा गाझामधील अल शिफा रुग्णालयावर हल्ला; 13 दिवसांत 400 जणांचा मृत्यू

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे.
Israel-Hamas War: इस्रायलचा गाझामधील अल शिफा रुग्णालयावर हल्ला; 13 दिवसांत 400 जणांचा मृत्यू
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. पॅलेस्टिनींच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरु होऊन जवळपास 6 महिने होत आहेत. नुकताच, इस्रायली लष्कराने गाझा येथील रुग्णालयावर हल्ला केला. इस्रायली लष्कराने या रुग्णालयाला अनेक दिवसांपासून वेढा घातला होता.

दरम्यान, एकीकडे अनेक देश इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम व्हावा अशी इच्छा व्यक्त करत असताना दुसरीकडे इस्रायलचे गाझावरील हल्ले वाढत आहेत. गाझामध्ये असलेल्या अल-शिफा रुग्णालयाला इस्रायली सैन्याने 13 दिवस वेढा घातला होता, त्यादरम्यान त्यांनी रुग्णालयावर सातत्याने हल्ले केले. गाझाच्या मीडिया ऑफिसच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या या हल्ल्यात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये रुग्णालयात दाखल रुग्ण, आरोग्य कर्मचारी आणि युद्धात जखमी झालेल्या लोकांचा समावेश आहे.

Israel-Hamas War: इस्रायलचा गाझामधील अल शिफा रुग्णालयावर हल्ला; 13 दिवसांत 400 जणांचा मृत्यू
Israel-Hamas War: हमासने विवस्त्र करुन काढली धिंड; तिच्या फोटोला मिळाला 'अवॉर्ड'; जगभर होतेय चर्चा

नऊ हजारांहून अधिक रुग्ण आहेत

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, गाझामध्ये 9 हजारांहून अधिक रुग्ण आहेत, ज्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ज्यांना परदेशात नेऊन लवकरात लवकर उपचार देण्याची गरज आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लोकांमध्ये अनेक रुग्ण जुन्या आजारांनी त्रस्त आहेत. यापैकी एक 12 वर्षांची मुलगी आहे, जी गंभीररित्या आजारी आहे. तिच्या काळजी आणि उपचारासाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथक कार्यरत आहे. दुसरीकडे, हल्ल्यांसोबतच गाझामध्ये उपासमारीचे संकटही अधिक गडद होत चालले आहे.

Israel-Hamas War: इस्रायलचा गाझामधील अल शिफा रुग्णालयावर हल्ला; 13 दिवसांत 400 जणांचा मृत्यू
Israel-Hamas War: इस्रायलचा गाझावर रात्रभर बॉम्बवर्षाव, आठ मुलांसह 18 जणांचा मृत्यू; शेल्टर होममध्ये 10 लाख लोक

दरम्यान, अलीकडेच 30 मार्च रोजी तीन जहाजांचा ताफा 400 टन अत्यावश्यक सामग्री घेऊन सायप्रसमधील बंदरातून गाझासाठी रवाना झाला. या अत्यावश्यक सामग्रीमध्ये तांदूळ, पास्ता, मैदा, सोयाबीन आणि भाज्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात दैनंदिन उपवास सोडण्यासाठी पारंपारिकरित्या खाल्ले जाणारे खजूरही आहेत. ही सर्व माहिती वर्ल्ड सेंट्रल किचन चॅरिटीने दिली. मात्र, ही सर्व जहाजे गाझाला कधी पोहोचतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चॅरिटीने या महिन्याच्या सुरुवातीला गाझाला 200 टन अन्न, पाणी आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला. या महिन्याच्या सुरुवातीला, संयुक्त राष्ट्रासह अनेक संस्थांनी गाझातील परिस्थिती पाहता उपासमारीचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com