Iraq: इराक सरकारचा मोठा निर्णय, मीडियावर लादला विचित्र निर्बंध!

Iraq: देशाच्या मीडिया रेग्युलेटरने ‘होमोसेक्सुअलिटी’ या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. बुधवारी तेथील सर्व मीडिया आणि सोशल मीडिया कंपन्यांना आदेश जारी करण्यात आला.
Iraq
IraqDainik Gomantak
Published on
Updated on

Iraq Government: इराक सरकारने ‘होमोसेक्सुअलिटी’ संदर्भात मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. देशाच्या मीडिया रेग्युलेटरने ‘होमोसेक्सुअलिटी’ या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे.

बुधवारी तेथील सर्व मीडिया आणि सोशल मीडिया कंपन्यांना आदेश जारी करण्यात आला. सर्व कंपन्यांनी ‘होमोसेक्सुअलिटी’ ऐवजी 'सेक्शुअल डिव्हिअन्स' हा शब्द वापरावा, असे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, 'जेंडर' या शब्दावरही बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दंडाचा अद्याप निर्णय झालेला नाही, परंतु त्यात दंडाचाही समावेश असू शकतो. ते म्हणाले की, इराक (Iraq) स्पष्टपणे समलैंगिकतेला गुन्हा मानत नाही.

Iraq
Iraq Missile Attack : इराकच्या कुर्दिस्तान भागात इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; 13 ठार तर 58 जखमी

60 हून अधिक देशांमध्ये 'समलैंगिकता' अपराध

LGBTIQ+ समुदायासाठी हा एक मोठा निर्णय आहे. 60 हून अधिक देशांमध्ये 'समलैंगिकतेला' अपराध घोषित करण्यात आला आहे, तर 130 हून अधिक देशांमध्ये समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता आहे.

Iraq
Violent Protests in Iraq: शिया धर्मगुरुच्या घोषणेनंतर इराकमध्ये हिंसक प्रदर्शन

इराकने दोन दिवसांपूर्वी टेलिग्राम सस्पेंड केले

इराकने दोन दिवसांपूर्वी टेलिग्राम सस्पेंड केले होते. यासाठी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला दिला होता. देशाच्या दूरसंचार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन वापरकर्त्यांचा पर्सनल डेटा संरक्षित करण्यासाठी त्यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅप ब्लॉक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com