Violent Protests in Iraq: शिया धर्मगुरुच्या घोषणेनंतर इराकमध्ये हिंसक प्रदर्शन

Violent Protests in Iraq: इराकचे प्रसिद्ध धार्मिक नेते मुक्तदा अल-सद्र यांनी सोमवारी देशाच्या राजकारणातून सन्यांस घेण्याची घोषणा केली आहे.
 Protests
ProtestsDainik Gomantak
Published on
Updated on

Violent Protests in Iraq: इराकचे प्रसिद्ध धार्मिक नेते मुक्तदा अल-सद्र यांनी सोमवारी देशाच्या राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या शेकडो समर्थकांनी निदर्शने सुरु केली. शिया धर्मगुरुंच्या घोषणेनंतर निदर्शनांदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 300 निदर्शक जखमी झाल्याचे इराकी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी पोलिसांनी (Police) अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यात 12 हून अधिक जण जखमी झाले. या दरम्यान अल-सद्र समर्थक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक चकमक झाली, ज्यामध्ये 20 आंदोलकांचा मृत्यू झाला.

 Protests
इराक पुन्हा बॉम्ब स्फोटानं हादरलं, 11 जणांचा मृत्यू

इराकमध्ये कर्फ्यू जाहीर

इराकी सैन्याने वाढता तणाव कमी करण्यासाठी सोमवारी कर्फ्यू (Curfew) देशभर जाहीर केला. दुसरीकडे, असे सांगण्यात येत आहे की, लष्कराने धार्मिक नेते मुक्तदा अल-सद्र यांच्या अनुयायांना हिंसक निदर्शने थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे इराकमध्ये आणखी हिंसाचार उसळण्याची भीती आहे. आधीच इराक (Iraq) राजकीय संकटाचा सामना करत आहे.

मुक्तदा अल-सद्र यांना संसदेत मिळालेल्या जागांवर बहुमत मिळाले नाही

ऑक्टोबरच्या संसदीय निवडणुकीत (Parliamentary Elections) मौलवी मुक्तदा अल-सद्र यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्यापासून इराकचे सरकार ठप्प झाले आहे, परंतु बहुमत गाठण्यात ते अपयशी ठरले. सर्वसहमतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी इराण समर्थित शिया प्रतिस्पर्ध्यांशी वाटाघाटी करण्यास नकार दिला. जुलैच्या सुरुवातीला, अल-सद्र यांच्या समर्थकांनी विरोधकांना सरकार स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी संसदेत प्रवेश केला. तिथे त्यांनी चार आठवड्यांहून अधिक काळ धरणे आंदोलन केले. त्यांच्या गटानेही संसदेचा राजीनामा दिला आहे.

 Protests
इराक हादरलं ! बसरा शहराजवळ बॉम्बस्फोटात चार ठार, 20 जण जखमी

अल-सद्र यांनी यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली होती

अल-सद्र यांनी निवृत्ती जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशा घोषणा केल्या आहेत. बर्‍याच जणांनी अल-सद्र यांच्या या निर्णयाचे वर्णन सध्याच्या गोंधळात प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध धार मिळविण्याचा आणखी एक प्रयत्न म्हणून केले आहे. मात्र, यावेळी त्यांच्या या निर्णयामुळे देशातील परिस्थिती आणखी बिघडू शकते, अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com