BRICS Summit 2026: "आम्ही कोणासमोरही झुकणार नाही!" भारताच्या भूमीवरुन इराणी अध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलवर हल्लाबोल VIDEO

Iranian President Masoud Pezeshkian Speech: नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आलेले इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी अमेरिका आणि इस्रायलवर अत्यंत तीव्र आणि कडक शब्दांत हल्लाबोल केला.
Iranian President Masoud Pezeshkian Speech
Iranian President Masoud PezeshkianDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Iranian President Masoud Pezeshkian Speech: नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आलेले इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी अमेरिका आणि इस्रायलवर अत्यंत तीव्र आणि कडक शब्दांत हल्लाबोल केला. नवी दिल्लीत धार्मिक नेते, विचारवंत आणि व्यावसायिकांना संबोधित करताना अध्यक्षांनी स्पष्ट केले की, इराणवर दबाव आणण्याचा आणि त्याला घाबरवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे, परंतु त्यांचा देश कोणत्याही परिस्थितीत कोणासमोरही झुकणार नाही.

पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इराणबाबत जागतिक स्तरावर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणी अध्यक्षांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या प्रचंड दबावाला न जुमानता इराण खंबीरपणे उभा आहे, जर त्यांनी आम्हाला धक्का दिला तर आम्ही सुद्धा त्याच तीव्रतेने पलटवार करु, असा थेट इशारा त्यांनी दिला.

Iranian President Masoud Pezeshkian Speech
Iran America Conflict: 5 तेल टँकर्स खाक झाल्यानंतर इराणचा मोठा गेम! अमेरिकेच्या 21 कोटींच्या 'ड्रोन पाणबुडी'वर केला कब्जा; व्हिडिओ शेअर VIDEO

आपल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी अमेरिका (America) आणि इस्रायलच्या मानवाधिकार धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. स्वतःला मानवाधिकारांचे कैवारी म्हणवणाऱ्या देशांनी लष्करी कारवायांच्या नावाखाली निष्पाप सामान्य नागरिकांना लक्ष्य केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत शस्त्रास्त्रांचा वापर करुन करण्यात आलेल्या एका हल्ल्यात तब्बल 168 शाळकरी मुलांचा नाहक बळी गेल्याचा खळबळजनक दावा इराणी अध्यक्षांनी केला.

Iranian President Masoud Pezeshkian Speech
Iran Oman New Route: ट्रम्प यांचा दावा ठरला फुसका फटाका! इराणनं ओमानसोबत हातमिळवणी करत रचला नवा 'गेम प्लॅन'; अमेरिकन जहाजे होणार जप्त?

जर एखाद्या देशाला युद्ध करायचेच असेल, तर त्यांनी ते केवळ सैनिक आणि लष्करी तळांपर्यंत मर्यादित ठेवले पाहिजे. सामान्य नागरिक, पायाभूत सुविधा, शाळा आणि रुग्णालयांवर होणाऱ्या हल्ल्यांचा त्यांनी तीव्र निषेध केला. इराणवर दहशतवादाचा ठपका ठेवण्यापूर्वी इतर महासत्तांच्या लष्करी कारवायांवरही जागतिक स्तरावर प्रश्न उपस्थित झाले पाहिजेत, असे ते म्हणाले.

Iranian President Masoud Pezeshkian Speech
Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

अध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी ठामपणे सांगितले की, इराणची जनता कोणत्याही दबावापुढे कधीही हार मानणार नाही. त्यांचा देश मानवी मूल्ये आणि सर्व मानवांच्या समान अधिकारांवर विश्वास ठेवतो. जगातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले पाहिजेत आणि कोणत्याही देश किंवा समुदायाविरुद्ध होणाऱ्या हिंसेचे समर्थन केले जाऊ शकत नाही.

Iranian President Masoud Pezeshkian Speech
US-Iran Tension: इराणविरोधात अमेरिकेकडून 'आर्थिक युद्धा'चा इशारा! इतिहासातील सर्वात मोठी कारवाई होणार? धमकीनंतर तेलाच्या किमतीनं गाठला उच्चांक

ब्रिक्स परिषदेदरम्यान इराणी अध्यक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत पश्चिम आशियातील परिस्थिती, प्रादेशिक स्थिरता, ऊर्जा सुरक्षा आणि सागरी मार्गांची सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. या दौऱ्यात भारताच्या भूमीवरुन इराणी अध्यक्षांनी दिलेला हा कडक इशारा आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारा ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Iran UN meme Sholay Thakur
Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
US Iran War Pentagon Audit Report 2026
America Strikes Iranian Oil Tankers:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com