Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

America Iran conflict Strait of Hormuz: इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी तणावाने पुन्हा एकदा उग्र रुप धारण केले. रविवारी अमेरिकन सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील एका बेटावर असलेल्या इराणी रॉकेट लाँचर्सवर मोठा हवाई हल्ला केला.
America Iran conflict Strait of Hormuz
donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

America Iran conflict Strait of Hormuz: इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी तणावाने पुन्हा एकदा उग्र रुप धारण केले. रविवारी अमेरिकन सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील एका बेटावर असलेल्या इराणी रॉकेट लाँचर्सवर मोठा हवाई हल्ला केला. हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद करण्यासाठी इराण तिथे सुरुंग पेरण्याची तयारी करत असल्याचा दावा यावेळी अमेरिकेने केला. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीचे नाव बदलून 'ट्रम्प स्ट्रेट' ठेवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मांडला.

यानंतर आता इराण आणि अमेरिकेतील (America) वाकयुद्ध कमालीचे रंगले. सिएरा लिओनमधील इराणी दूतावास या वादात उतरला असून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधत "हबीबी (अंकल सॅम), इराणला या!" असा टोला लगावला. यासोबत त्यांनी 35 सेकंदांचा 3डी ॲनिमेटेड व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये प्रसिद्ध 'माइनस्वीपर' गेमच्या माध्यमातून अमेरिकेला आव्हान देण्यात आले.

America Iran conflict Strait of Hormuz
Iran Missile Attack: "बदला घ्याल तर उद्ध्वस्त करु!" ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा पलटवार, जॉर्डन-बहारीनमधील लष्करी तळांवर डागली क्षेपणास्त्रे

होर्मुझच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गावरील इराणचे सागरी भुसुरुंग हटवण्याचे काम अमेरिकेने नुकतेच पूर्ण केले. ट्रम्प यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, जर इराणच्या कोणत्याही जहाजाने पुन्हा भुसुरुंग पेरण्याचा प्रयत्न केला, तर ते जहाज जागीच नष्ट केले जाईल. या धमकीला प्रत्युत्तर म्हणून इराणने जॉर्डनस्थित दोन अमेरिकन लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला, ज्यामध्ये अमेरिकेचे मोठे नुकसान झाले.

America Iran conflict Strait of Hormuz
Iran Prison: 'इराणच्या तुरुंगात महिलांवर क्रूर अत्याचार...'!, ट्रम्पचा खळबळजनक दावा; द जेरुसलेम पोस्टचा रिपोर्ट केला शेअर

अमेरिकेने पुन्हा एकदा इराणच्या लष्करी तळांवर प्रतिहल्ले केले असून ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणला अत्यंत कठोर शब्दांत धमकी दिली. "इराणने या कायदेशीर हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची चूक केली, तर त्यांच्यावर आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल. तो हल्ला इतका भीषण असेल की इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचा अगदी नाममात्र भागच शिल्लक राहील," असा इशारा ट्रम्प यांनी दिला. गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या या युद्धामागे इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणे हा ट्रम्प यांचा मुख्य उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com