Iran entered Iraq and fired a ballistic missile at Mossad headquarters, which killed four people:
इराणने इराकची सीमेत घूसून इस्रायलच्या गुप्तचर मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने या हल्ल्याची माहिती दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गार्ड्सने सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरोधातही हल्ले केले आहेत. नुकताच इराणमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. इराणने इस्त्रायलवर हल्ल्याचा आरोप केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केला.
रिव्होल्युशनरी गार्ड्सने सांगितले की, त्यांनी उत्तर इराकी शहर एर्बिल जवळ इस्रायलच्या मोसाद एजन्सीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
आयएस या दहशतवादी संघटनेच्या बैठका उद्ध्वस्त करण्यासाठीही या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही वापर करण्यात आला होता.
सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, एर्बिलच्या उत्तर-पूर्वेला सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकन दूतावास तसेच नागरी वस्त्यांपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला.
क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या कोणत्याही सुविधांवर परिणाम झाला नसल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र, या हल्ल्याला इस्रायली अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवाशांना एर्बिल विमानतळावरच थांबवण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात इराणमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये 100 लोकांचा मृत्यू झाला होता. बॉम्बस्फोटामुळे इस्रायल-हमास युद्धाचा धोका वाढला आहे.
तणावपूर्ण परिस्थिती पाहता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन अरब देशांना भेट देऊ शकतात. इराण आणि हमासने या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. मात्र, अमेरिकेने हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.