इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी तरुणाचा हैदोस, कार चोरुन इस्रायलींना चिरडले; 13 जणांची प्रकृती चिंताजनक

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत.
Accident
AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. या लढाईत इस्रायलने 1300 हून अधिक लोकांचा जीव गमावला आहे, तर दुसरीकडे गाझामध्ये 23 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. या भीषण युद्धात इस्रायली आर्मी आयडीएफचे गाझामधील ग्राउंड ऑपरेशन सुरुच आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमास पूर्णपणे नष्ट होईपर्यंत लढा सुरु ठेवण्याची शपथ घेतली आहे. दरम्यान, पॅलेस्टिनी तरुणाने इस्रायलमध्ये घुसून कार चोरुन डझनभर लोकांना चिरडल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यातील 13 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीला पकडले आहे.

दरम्यान, एका पॅलेस्टिनीने सोमवारी मध्य इस्रायलमध्ये कार चोरली आणि लोकांवर हल्ला केला, असे इस्रायली पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात 13 लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या हेतूंचा तपास केला जात आहे. तेल अवीवच्या उत्तरेला असलेल्या राआनाना येथे झालेल्या या घटनेत काही जणांना भोसकल्याचेही इस्रायली माध्यमांनी सांगितले आहे. हमासबरोबर तीन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या युद्धामुळे गाझामध्ये वाढलेल्या सुरक्षा तणावादरम्यान ही घटना घडली आहे.

Accident
Israel-Hamas War: ''जिथे संधी मिळेल तिथे बदला घेऊ''; लेबनॉन आणि इराणमधील भीषण हल्ल्यांदरम्यान इस्रायलची धमकी

"हा दहशतवादी हल्ला होता," असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार, संशयित वेस्ट बॅंकमधील हेब्रॉन शहरातील आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आधीच्या अहवालात साक्षीदारांचा हवाला देऊन आर्मी रेडिओने सांगितले की, ही घटना कार जॅकिंगची असू शकते, ज्या दरम्यान चोरीचे वाहन क्रॅश झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com