Iran-backed Houthi rebels in Yemen have hijacked a cargo ship in the Red Sea, threatening global shipping lanes:
इस्रायल सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील मालवाहू जहाजाचे अपहरण केले, ज्यामुळे जागतिक शिपिंग मार्गाला धोका निर्माण झाला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने कोणाचेही नाव न घेता या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. पंतप्रधानांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे जहाज एका ब्रिटीश कंपनीच्या मालकीचे होते आणि ते जपानी कंपनी चालवत होते. जहाजातील 25 क्रू मेंबर्सपैकी कोणीही इस्रायली नसल्याचे म्हटले आहे.
येमेनच्या हौथी बंडखोरांनी ऑक्टोबरच्या सुरूवातीपासून पॅलेस्टीनी दहशतवादी गट हमासच्या विरुद्धचे युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलवर हल्ले करण्याची धमकी दिली होती.
येमेनमधील हुथी बंडखोरांनी सांगितले की, ते इस्रायली ध्वज असलेली जहाजे तसेच इस्रायली कंपन्यांद्वारे चालवलेल्या किंवा त्यांच्या मालकीच्या जहाजांना लक्ष्य करतील.
हौथी प्रवक्त्याने ट्विटरवर पोस्ट करत इतर देशांना इस्रायली जहाजांवर काम करणाऱ्या नागरिकांना परत बोलवण्याचे आवाहन केले आहे.
हुथी बंडखोर गट येमेनमध्ये स्थित आहे, ज्यामुळे ते लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांवर हल्ले करू शकतात.
यापूर्वी जानेवारी २०२२ मध्ये, हौथींनी सौदी अरेबियाच्या रुग्णालयासाठी पुरवठा करणारे यूएई-ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाचे अपहरण केले होते.
हौथींना इराणकडून प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य, अत्याधुनिक शस्त्रे, ड्रोन, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे मिळत असल्याचे म्हटले जाते.
नेतान्याहू यांच्या कार्यालयाने रविवारच्या हल्ल्यासाठी तेहरान सरकारला जबाबदार धरले. तसेच जागतिक शिपिंग लेन धोक्यात येत असल्याचे म्हटले आहे.
इराणने या घटनेवर आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायली सरकारने सांगितले की, जहाजाच्या क्रू मेंबर्समध्ये युक्रेन, बल्गेरिया, फिलिपिन्स आणि मेक्सिकोचे लोक होते. हल्ल्याच्या वेळी हे जहाज तुर्कीहून भारताकडे जात होते, असे इस्रायलच्या लष्कराने सांगितले.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार या जहाजावर बहामाचा ध्वज होता. हे जहाज एका ब्रिटिश कंपनीकडे नोंदणीकृत आहे. हे अंशतः इस्रायली टायकून अब्राहम उंगार यांच्या मालकीचे आहे. सध्या ते एका जपानी कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे.
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने दहशतवादी हल्ला केला होता, त्यानंतर इस्रायल गाझावर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. हौथी लोक सतत इस्रायलला विरोध करत आहेत. या जहाजात युक्रेन, बल्गेरिया, फिलीपिन्स आणि मेक्सिकोचे कर्मचारी आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.