Pakistan सरकार झिरो, इम्रान खान हीरो; पूर्व मंत्र्यांने शरीफ सरकारवर साधला निशाणा

Sheikh Rasheed Ahmed: पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारवर निशाणा साधला आहे.
Sheikh Rasheed Ahmed
Sheikh Rasheed AhmedDainik Gomantak
Published on
Updated on

Former Minister of Pakistan Sheikh Rasheed Ahmed: पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद (Sheikh Rasheed Ahmed) यांनी शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारवर निशाणा साधला आहे. 'पाकिस्तान सरकार झिरो, इम्रान खान हिरो', असे लहान मुलांच्या शैलीत रशीद म्हणाले आहेत. शेख रशीद यांनी ट्विट करत पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ यांच्यावर हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले, 'अविश्वास प्रस्तावाचा निर्णय लंडनमध्ये घेण्यात आला. नवाझ शरीफ आता सरकारमधून बाहेर पडण्याची चर्चा करत आहेत.'

दरम्यान, देशातील वाढत्या महागाईवरुनही (Inflation) त्यांनी शरीफ यांच्यावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, 'पाकिस्तान 'आर्थिक कोंडीत' अडकला आहे. लोकांना बिलेही भरता येत नाहीत.' अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख पुढे असेही म्हणाले की, 'पाकिस्तानचे मित्र देशही आता मदतीसाठी पुढे येत नाहीत. चीन, युएई, कतार (Qatar) किंवा सौदी अरेबिया (Saudi Arabia) यापैकी कोणीही यावेळी पाकिस्तानला मदत करत नाही. आयएमएफकडून निधी मिळवण्यातही सरकारला अपयश आले आहे.'

Sheikh Rasheed Ahmed
Pakistan News:पाकिस्तान मध्ये हिंदू मुलीच्या सक्तीच्या धर्मांतराला विरोध

IMF कडूनही निधी मिळत नाही

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानच्या (Pakistan) लष्करप्रमुखांनी IMF कडून तात्काळ $1.7 अब्ज डॉलरची आर्थिक मदत मिळावी यासाठी अमेरिकेकडे मदत मागितली आहे, अशी माहिती आहे. जनरल कमर जावेद बाजवा यांनी अमेरिकेच्या उप परराष्ट्र सचिव वेंडी शर्मन यांच्याशी चर्चा केली असून पाकिस्तानला मदत मिळवून देण्यासाठी अमेरिकेकडे विनंती केली आहे. मात्र, अद्याप अमेरिकेकडून कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही.

Sheikh Rasheed Ahmed
सुल्तानीनंतर Pakistan त अस्मानी संकट; कराचीसह अनेक शहरे पाण्याखाली

पत्रकारांना टार्गेट केल्याचा आरोप

रशीद यांनी याआधी पाकिस्तान सरकारवर देशातील पत्रकारांना लक्ष्य केल्याचा आरोप केला होता. खरे तर, माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक आणि लष्करावरील कठोर टीकाकार मानल्या जाणाऱ्या एका प्रसिद्ध टीव्ही पत्रकाराला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. पंजाबच्या अट्टक जिल्हा पोलिसांनी त्याच्यावर हिंसाचार भडकवण्याचा आणि द्वेष पसरवल्याचा आरोप ठेवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com