इसिसमध्ये दाखल होण्यासाठी ती घरातून पळाली! कोर्टानं दणका देत नाकारलं नागरिकत्व

Bangladeshi Origin Shamima Begum: लंडनमध्ये जन्मलेल्या बांगलादेशी वंशाच्या शमीमा बेगमने नागरिकत्व मिळवण्यासाठी केलेले अपील फेटाळण्यात आले आहे.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Bangladeshi Origin Shamima Begum: लंडनमध्ये जन्मलेल्या बांगलादेशी वंशाच्या शमीमा बेगमने नागरिकत्व मिळवण्यासाठी केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. वयाच्या 15 व्या वर्षी ती इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी पळून गेली होती. दरम्यान, ब्रिटनचे नागरिकत्व मिळवण्यासाठी आणि सीरियातून ब्रिटनमध्ये परतण्याचे आणखी एक कायदेशीर अपील शुक्रवारी फेटाळण्यात आले. याआधी 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने तिला ब्रिटनमध्ये परतण्यापासून रोखण्याचा निर्णय कायम ठेवला होता.

ब्रिटिश नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज केला

दरम्यान, अनेक कायदेशीर लढ्यांनंतर बेगम गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये स्पेशल इमिग्रेशन अपील कमिशन (SIAC) मध्ये हारली, नंतर तिचे केस अपीलीय कोर्टात गेली. मात्र, न्यायाधीशांनी विशेष न्यायाधिकरणाच्या निर्णयाशी एकमताने सहमती दर्शवत अपील फेटाळून लावले. लंडनमध्ये आपला निर्णय सुनावताना न्यायाधीश डेम स्यू कार म्हणाले की, "बेगम काही गोष्टींनी प्रभावित झाली असेल, परंतु तिने सीरियाला जाण्याचा आणि आयएसआयएसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.''

Court
Israel Hamas War: युद्धानंतर कसं असलं गाझाचं रुपडं, नेतन्याहू यांनी मांडला प्लॅन; जाणून घ्या काय आहे खास?

कोण आहे शमीमा बेगम?

शमीमा बेगम सध्या उत्तर सीरियातील निर्वासित छावणीत आहे. बॅरिस्टर सामंथा नाइट्स यांनी तिचे प्रतिनिधित्व केले. नाइट्स यांनी असा युक्तिवाद केला की, कायदेशीर कर्तव्यांचा विचार करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे, यूके होम ऑफिसने यावर जोर दिला की, या प्रकरणाचा मुख्य फोकस राष्ट्रीय सुरक्षेवर होता. ब्रिटीश सरकारचे म्हणणे आहे की, बेगम बांगलादेशी पासपोर्ट घेऊ शकते, परंतु तिच्या कुटुंबाचा असा युक्तिवाद आहे की ती ब्रिटीश आहे आणि तिने कधीही बांगलादेशी नागरिकत्व घेतलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com