'...सरकारला ब्लॅकमेल केले जात होते', इम्रान खान यांनी लष्करावर साधला निशाणा

पाकिस्तानात (Pakistan) एकाच वेळी दोन संकटे सुरु आहेत.
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

Imran Khan on Pakistan Army: पाकिस्तानात एकाच वेळी दोन संकटे सुरु आहेत. एकीकडे देश आर्थिक संकटातून जात असताना दुसरीकडे राजकीय स्थितीही खराब आहे. आघाडी सरकार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. सरकारला घेरण्यासाठी इम्रान खान रोज वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा करत आहेत. आता त्यांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवला आहे. आपले सरकार ‘कमकुवत’ असून, आम्हाला ब्लॅकमेल केले जात होते. मी पंतप्रधान असताना माझ्याकडे सत्ता नव्हती आणि सत्तेत कोण हस्तक्षेप करत होते हे सर्वांना माहीत आहे.

आमचे हात बांधले गेले

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की, ''जेव्हा आम्ही सत्तेवर आलो तेव्हा आमचे सरकार "कमकुवत" होते. आमचे हात बांधलेले होते. आम्हाला ब्लॅकमेल करण्यात आले. आमच्याकडे सत्ता नव्हती. पाकिस्तानची (Pakistan) सत्ता कुठे आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागला.''

Imran Khan
''पाकिस्तान भारतासोबतच्या व्यापारासाठी प्रयत्नशील'' पण ...

लष्कर आणि सरकार यांच्यात समतोल आहे

खान म्हणाले की, 'शत्रूंच्या धोक्यामुळे देशाला "सशक्त सैन्य" आवश्यक आहे, परंतु एक मजबूत आणि शक्तिशाली प्रशासन यांच्यात "संतुलन" करणे देखील खूप महत्वाचे आहे. आम्ही सर्व वेळ त्यांच्यावर अवलंबून असायचो. आम्ही खूप चांगले काम केले परंतु अनेक गोष्टी ज्या करायला हव्या होत्या त्या करता आल्या नाहीत. त्यांच्याकडे सत्ता आहे कारण ते NAB (National Accountability Bureau) सारख्या संस्थांवर नियंत्रण ठेवतात, जे आमच्या नियंत्रणाखाली नव्हते.'

Imran Khan
''पाकिस्तान कर्जात बुडाला'': पंतप्रधान शाहबाज शरीफ

इम्रान यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे हटवण्यात आले

विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर कमी मते मिळाल्याने एप्रिलमध्ये इम्रान खान यांना खुर्चीवरुन पायउतार व्हावे लागले होते. अविश्वास प्रस्तावाद्वारे पदच्युत होणारे ते पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले. त्यानंतर रशिया, चीन आणि अफगाणिस्तानबाबतच्या (Afghanistan) स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे अमेरिकेने आपल्याला अस्थिर करण्याचा कट रचून सत्तेतून बेदखल केल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com