पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shehbaz Sharif) यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या (New Government of Pakistan) बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. बैठकीनंतर शरीफ म्हणाले, 'पाकिस्तान (Pakistan) कर्जात बुडाला आहे. त्यामुळे या कर्जरुपी बोटीला किनार्यावर आणणे नव्या सरकारचे काम आहे.' मंत्रिमंडळाला संबोधित करताना शरीफ पुढे म्हणाले, 'मी याला ''युद्ध मंत्रिमंडळ'' (Inflation in Pakistan) मानतो कारण आपण गरिबी, बेरोजगारी, महागाई यांच्याविरोधात लढत आहोत. हे सर्व समस्यांविरुद्धचे युद्ध आहे.'' त्यांचे भाषण राज्य माध्यमांनी प्रसारित केले आहे. (After the first cabinet meeting Prime Minister Shehbaz Sharif said that Pakistan was in debt)
ते पुढे म्हणाले की, 'इम्रान खान यांचे सरकार विविध प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयशी ठरले. सल्लामसलत करण्याच्या "गहन आणि निरंतर" प्रक्रियेद्वारे त्यांनी देशाला, विशेषतः गरीब कुटुंबांना दिलासा देण्यावर भर दिला.' शरीफ यांनी मंत्रिमंडळात सामील झाल्याबद्दल मित्रपक्षांचे आभार मानले आणि समस्या सोडवण्यासाठी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या क्षमतेचे कौतुक केले. आपल्या युतीच्या भागीदारांचे आभार मानताना ते म्हणाले, "आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आम्ही भ्रष्ट सरकार हटवून घटनात्मक आणि कायदेशीररित्या पदभार स्वीकारला आहे."
कर्ज ही प्रमुख समस्या
ते पुढे म्हणाले, 'ही युती पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात व्यापक आहे. ही युती पक्षांच्या वेगवेगळ्या राजकीय विचारांची पर्वा न करता जनतेची सेवा करेल.' शरीफ म्हणाले की, मंत्रिमंडळ हे "अनुभव आणि तरुणांचे संयोजन" आहे. विविध मुद्यांचा उल्लेख करताना ते पुढे म्हणाले की, ''वीज टंचाई आणि प्रचंड कर्ज या देशासमोरील प्रमुख समस्या आहेत. देश कर्जाच्या खाईत बुडत आहे, परंतु कर्जरुपी बोट आपल्याला किनाऱ्यावर न्यावी लागेल.''
इम्रान खान यांच्यानंतर पंतप्रधान
इम्रान खान (Imran Khan) यांची जागा आता शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी घेतली आहे. ज्यांची 10 एप्रिल रोजी अविश्वास ठरावाद्वारे सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली होती. या प्रस्तावावर नॅशनल असेंब्लीमध्ये मतदान झाले, जिथे विरोधकांना 174 मते मिळाली, तर अविश्वास प्रस्तावाला विजयासाठी 172 मतांची आवश्यकता होती. त्याच वेळी, तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान बहुमत सिद्ध करु शकले नाही. याच कारणामुळे इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर शाहबाज शरीफ देशाचे नवे पंतप्रधान झाले. मार्चच्या सुरुवातीलाच विरोधकांनी नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यांनी देशाचे आर्थिक व्यवस्थापन नीट केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. सर्वाधिक कर्जे त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आली आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.