Imran Khan: इम्रान यांच्याबाबत संशयाचे धुके, मृत्यू झाल्याची चर्चा; अधिकृत स्पष्टीकरण नाही

Imran Khan death rumours: विविध आरोपांखाली २०२३ पासून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त येथील सोशल मीडियामध्ये चांगलेच पसरले होते.
Imran Khan:
Imran Khan:Dainik Gomantak
Published on
Updated on

रावळपिंडी: विविध आरोपांखाली २०२३ पासून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त येथील सोशल मीडियामध्ये चांगलेच पसरले होते. ‘अफगाण टाइम्स’ या संकेतस्थळाने इम्रान यांची तुरुंगात हत्या झाल्याची शंका व्यक्त करणारे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ही चर्चा होऊ लागली. त्यातच, इम्रान यांच्या बहिणींनाही मागील महिनाभरापासून त्यांना भेटू न दिल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. सोशल मीडियावर याबाबतच्या प्रतिक्रियांचा पूर येऊनही सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांत आरोपी असलेल्या ७२ वर्षीय इम्रान खान यांना रावळपिंडी येथील अडियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. ‘अफगाण टाइम्स’ने ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून इम्रान यांचा मृत्यू झाल्याची शंका उपस्थित केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जणांनी इम्रान यांचा तुरुंगात खून झाल्याचा दावा करणारी विधाने केली.

Imran Khan:
Goa Politics: 'आघाडी नको, निवडणूक आम्ही स्वबळावर लढू', काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका; विरोधकांच्या आघाडीचा गुंता अजूनही सुटेना

इम्रान यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर सुरू झालेली चर्चा वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली आणि त्यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी अडियाला तुरुंगाबाहेर गर्दी केली. मात्र, या गर्दीला तुरुंग अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. इम्रान यांचा पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनीच खून केल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.

इम्रान यांच्या बहिणींनाही मागील एक महिन्यापासून त्यांची तुरुंगातील भेट नाकारली जात आहे. त्यामुळे ‘इम्रान खान कोठे आहेत?’ असा प्रश्‍न सोशल मीडियावर विचारला जात आहे. इम्रान खान यांना स्ट्रेचरवर ठेवल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर पसरले होते, मात्र ते बनावट असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

Imran Khan:
Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

बहिणींना मारहाण

इम्रान खान यांच्या तीन बहिणी- नोरीन, अलीमा आणि उझ्मा या मागील महिन्यापासून इम्रान यांची भेट घेण्यासाठी अडियाला तुरुंगात चकरा मारत आहेत. मात्र, त्यांना भेट घेण्याची परवानगी न मिळाल्याने काही दिवसांपासून त्या तुरुंगाबाहेर आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप या बहिणींनी केला आहे. पोलिसांनी आपल्या केसांना धरून ओढत रस्त्यावर ढकलून दिले, असा आरोप एका बहिणीने केला आहे. या तिघी बहिणीही ज्येष्ठ नागरिक आहेत. पोलिसांकडून इम्रान यांनाही अनेकदा मारहाण झाल्याचा दावा या बहिणींनी केला आहे.

इम्रान यांची याचिका मंजूर

इम्रान खान यांच्या मृत्युबाबतच्या चर्चांना उधाण आले असतानाच लाहोर येथील उच्च न्यायालयात इम्रान यांनी केलेली एक याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या सर्व १०७ प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली होती. ही याचिका सुनावणीस घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com