Imran Khan: टाइम्स मॅगझीनच्या कव्हरफोटोवर भडकले इम्रान खान यांचे समर्थक; म्हणाले मुस्लीम देश...

Imran Khan: लोकसंख्येच्या तुलनेत याचे विभाजन केले तर प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला 20 डॉलर येतील.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Imran Khan: पाकिस्तान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये नागिकांचे महागाईमुळे हाल होत असल्याच्या सातत्याने बातम्या येत असतात. याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यामुळे देखील पाकिस्तान आंतरराष्ट्रीय राजकारणात सातत्याने चर्चेत आहे.

आता मात्र इम्रान खान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. अमेरिकेच्या टाइम्स या प्रतिष्ठित मॅगझीनवर इम्रान खान यांना जागा मिळाली आहे. पुढच्या महिन्यात येणाऱ्या Influential TIME Magazine च्या कव्हर पेज वर The Astonishing Saga of Imran Khan म्हणजेच इम्रान खान यांची आश्चर्यचकित करणारी गाथा या कॅप्शनसहित छापला आहे.

टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानात राजकीय स्थिरता निवडणुकांमधून येते आणि आर्थिक स्थिरता येण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे आहे. यावर टाइम्सने लिहले आहे की.

जगात पाचव्या क्रमांकावर लोकसंख्या असणाऱ्या देशाकडे फक्त 4.6 बिलियन डॉलर परकीय गंगाजळी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत याचे विभाजन केले तर प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला 20 डॉलर येतील. अशा परिस्थितीत फक्त निवडणुका घेणे हा एकच पर्याय पुरेसे असणार नाही असे टाइम्सने म्हटले आहे.

इम्रान खान यांच्या समर्थकांना मात्र ही मुलाखत आणि टाइम्स मॅगझीनवरचा फोटो आवडला नाही. त्यांनी त्याचा विरोध करण्यास सुरुवात केली आहे. मुलाखत घेणाऱ्या चार्ल्स कॅंपबेलवर समर्थक आपला राग व्यक्त करत आहेत.

इम्रान खान यांची पीटीआई समर्थक माज उद दीन ने मॅगझीनवरील कव्हर फोटो ट्वीटवर शेअर करत लिहले आहे की, टाइम्सचा मुस्लीम देशांप्रति असणारा दृष्टीकोण अमेरिकी आणि पश्चिमी देशांच्या दृष्टीकोणापासून वेगळा नाही हे आता कोणापासूनच लपले नाही असे म्हटले आहे. या ट्वीटला शेकडो समर्थकांनी शेअर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, याआधी 2020 ला तत्कालिन पंतप्रधान इम्रान खान यांना टाइम्सच्या कव्हरवर जागा मिळाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com