ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris johnson) लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे, असे एका आघाडीच्या ब्रिटीश बुकीने सांगितले आहे. बोरिस जॉन्सन यांच्या जागी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना ब्रिटनचे (Britain) नवे पंतप्रधान बनवले जाऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे. ऋषी सूनक (Rishi Sunak) हे बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत.
'बेटफेअर' कंपनीने म्हटले आहे की, कोविड महामारीच्या काळात लॉकडाउनमध्ये पार्टी केल्याने 57 वर्षीय पंतप्रधानांवर राजीनामा देण्याचा दबाव वाढत आहे. हा दबाव केवळ विरोधकांचाच नाही तर बोरिस जॉन्सन यांच्या स्वत:च्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचाही आहे.
बेटफेअरचे सॅम रोसबॉटम यांनी 'वेल्स ऑनलाइन'ला सांगितले की, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यास ऋषी सूनक यांची या पदासाठी निवड केली जावू शकते. यानंतर परराष्ट्र सचिव लिझ ट्रस, कॅबिनेट मंत्री मायकल गोव्ह यांचा क्रमांक लागतो. पंतप्रधानपदाच्या या शर्यतीत भारतीय वंशाच्या प्रिती पटेल यांचाही समावेश आहे. प्रिती पटेल सध्या यूकेच्या गृहसचिव म्हणून कार्यरत आहेत.
ज्या बिअर पार्टीमुळे बोरिस जॉन्सनवर राजीनामा देण्याचा दबाव वाढत आहे, ती पार्टी मे 2020 मध्ये पंतप्रधानांच्या डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आणि आज बोरिस जॉन्सनला गि पार्टी करणे चांगलेच भोवले.
बुधवारी, हाऊस ऑफ कॉमन्सच्या चेंबरमध्ये, बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाउन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल मनापासून माफी मागितली. यावेळी ऋषी सुनक उपस्थित नव्हते, अडचणीत असलेल्या बोरिस जॉन्सनपासून दूर राहण्याचा प्रयत्न ते करत असल्याची अटकळ सुरू झाली होती. या अंदाजांना उत्तर देताना सुनक यांनी एक ट्विट केले. व्यस्ततेमुळे मी या सभेला उपस्थित राहू शकलो नाही असे स्पष्टिकरण त्यांनी या ट्विटमधून दिले. बीबीसीच्या वृत्तानुसार, काही ब्रिटीश वृत्तपत्रांनी सुनकचे हे ट्विट बोरिस जॉन्सनचे समर्थन म्हणून पाहिले आहे.
बोरिस जॉन्सन यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'मला माफी मागायची आहे. मला माहित आहे की गेल्या 18 महिन्यांत लाखो लोकांनी आपले जीव गमावले असाधारण त्रास सहन केला. आणि केलेल्या प्रकारामुळे माझ्याबद्दल आणि सरकारबद्दल किती राग आहे हे मला माहीत आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.