मुलांनंतर आता अफगाण नागरिकांना किडनीचा करावा लागतोय व्यापार

हेरात या पश्चिम प्रांतात (Herat Province) पैशाची गरज असलेल्या अनेकांनी किडनी विकून आपला जीव धोक्यात घातला आहे.
Afghans
AfghansDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमधील अशरफ घनी यांचे लोकशाही वादी सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी आपली सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापनेत पाकिस्तान आणि चीनने मदत केली असल्याचा आरोप सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरुन करण्यात येतो. मात्र पाकिस्तान आणि चीन हे आरोप फेटाळून लावतात. तालिबानची राजवट अफगाणिस्तानमध्ये स्थापन झाल्यानंतर लाखो अफगाण नागरिकांनी देश सोडला.

याच पाश्वभूमीवर अफगाणिस्तानची (Afghanistan) आर्थिक स्थिती पूर्णपणे बिकट होत चालली आहे. देशातील वाढत्या गरिबीला कंटाळलेल्या अफगाण नागरिकांना शरीराचे अवयव विकण्यास भाग पाडले जात आहे. निराधारांची वाढती संख्या आणि नागरिकांविरोधात घेतले जात असलेले कठोर निर्णय यातून अफगाणिस्तानच्या दुर्दशेची स्पष्ट साक्ष देतात. हेरात या पश्चिम प्रांतात पैशाची गरज असलेल्या अनेकांनी किडनी विकून आपला जीव धोक्यात घातला आहे.

Afghans
'प्लेबॉय' इम्रान खानने कंडोमवर लावला कर, बिलावल भुट्टो संतापत म्हणाले...

दरम्यान, काबुलमधून (Kabul) अमेरिकन आणि नाटो सैन्याने माघार घेतल्यानंतर ऑगस्टच्या मध्यात तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली. तालिबान राजवट परत आल्यापासून अफगाणिस्तानातील नागरिकांना गरिबीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्याकडे खायलाही पैसेही नाहीत. तालिबान (Taliban) सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना पैशांऐवजी धान्य दिले जात आहे. देशात गरिबी एवढी आहे की, अफगाण नागरिकांना स्वत:च्या मुलांचाही सौदा करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असलेल्या अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली आहे.

2021 मध्ये 85 किडनी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशन्स झाल्या

यूरोलॉजिस्ट आणि किडनी प्रत्यारोपण सर्जन डॉ. नासिर अहमद (Dr. Nasir Ahmed) यांनी सांगितले की, आम्ही 2021 मध्ये 85 किडनी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशन्स केले आहेत. किडनी दाता आणि खरेदीदार यांच्या परस्पर संमतीने संपूर्ण मूत्रपिंड प्रत्यारोपण ऑपरेशन केले जाते, ज्याची किंमत सुमारे 6,00,000 अफगाणी ते 8,00,000 अफगाणी आहे. रक्ताच्या प्रकारानुसार, मूत्रपिंडाची किंमत सुमारे 2,00,000 अफगाणी ते 4,00,000 अफगाणी असू शकते. यामध्ये हॉस्पिटलचे शुल्क, औषध आणि ऑपरेशनचे शुल्क 4,00,000 अफगाणीपर्यंत पोहोचू शकते.

गरिबीशी झुंजणाऱ्या लोकांना किडनी विकावी लागली

अहमद यांनी पुढे सांगितले की, किडनी विकणारे बरेच लोक खूप गरीब आहेत, ज्यांना आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करण्यासाठी किडनी विकण्यासारखे कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. तथापि, डॉक्टर वारंवार इशारा देत आहेत की, अशा हालचालीचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. किडनी विकण्यासाठी पुढे आलेले बहुतांश देणगीदार हे अफगाणिस्तानमधील विनाशकारी आर्थिक संकटामुळे प्रभावित झालेल्या गरीब कुटुंबातील आहेत. एवढेच नाही तर एक किडनी नसल्यामुळे त्यांना कोणकोणत्या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो, याचीही त्यांना कल्पना नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com