
एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबत नाही तर दुसरीकडे इस्रायलच्या पाठिंब्याने अमेरिकेने येमेनवर बॉम्ब वर्षाव सुरु केला आहे. दररोज येमेनी शहरांवर हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही हुथी बंडखोर मागे हटण्यास तयार नाहीत. येमेनच्या हुथींनी डागलेल्या क्षेपणास्त्रांनी बेन गुरियन विमानतळावर हल्ला केल्याची पुष्टी इस्रायली सूत्रांनी केली आहे. या हल्ल्याचे अनेक फुटेजही समोर आले आहेत.
दरम्यान, येमेनच्या (Yemen) दिशेने क्षेपणास्त्र डागल्यानंतर मध्य इस्रायलमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक फोटोंमध्ये सायरनचा आवाज ऐकून इस्रायली लोक सैरावैरा धावताना दिसत आहेत. वृत्तानुसार, विमानतळावरील या हल्ल्यात एक इस्रायली जखमी झाला आहे. हुथी क्षेपणास्त्राबाबत आयडीएफचे म्हणणे आहे की, त्यांनी ते रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु ते विमानतळ कंपाऊंड रोडला लागून असलेल्या बागेत पडले.
नॅशनल युनिटीचे अध्यक्ष आणि माजी इस्रायली मंत्री बेनी गँट्झ, ज्यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या गाझा युद्धाबाबतच्या धोरणाच्या निषेधार्थ सरकारमधून बाहेर पडले होते. या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. "हे येमेन नाहीये, हे इराण आहे. इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागणारा इराणच आहे आणि त्याने जबाबदारी घेतली पाहिजे," असे मंत्री बेनी गँट्झ यांनी ट्विट करुन सांगितले.
2023 मध्ये इस्रायलने गाझावर हल्ले सुरु केल्यानंतर हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात वेढा घातला आणि गाझाशी एकता दाखवण्यासाठी इस्रायलवर हल्ले केले. इस्रायल गाझामधील हल्ले थांबवत नाही तोपर्यंत ते त्यांच्या कारवाया सुरुच ठेवतील असे हुथी बंडखोरांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.