

PAK Player Unable Speak English: पाकिस्तान क्रिकेट संघाने 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या फायनल सामन्यात कुवेतचा पराभव करुन सहाव्यांदा 'हाँगकाँग सिक्सस 2025' या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मात्र, हा विजय मिळूनही पाकिस्तानच्या संघाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान पाकिस्तानी कर्णधार आणि त्याच्यासोबत असलेल्या इंग्रजी अनुवादकामुळे ही नामुष्की ओढवली.
हाँगकाँग सिक्सस 2025 चा फायनल सामना पाकिस्तान आणि कुवेत यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 विकेट गमावून 135 धावा केल्या. अब्बास आफ्रिदीने 52 धावांची शानदार अर्धशतकी खेळी खेळली, तर अब्दुल समदने 42 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानने या खेळीच्या जोरावर कुवेतला विजयासाठी 136 धावांचे आव्हान दिले, मात्र त्यांचा संपूर्ण संघ केवळ 92 धावांवरच ऑलआऊट झाला. पाकिस्तानने 43 धावांनी हा सामना जिंकून विजेतेपद पटकावले. गोलंदाजीमध्ये माज सदाकतने पाकिस्तानसाठी 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.
मात्र, ट्रॉफी उचलताना पाकिस्तानी संघात आनंदाचे वातावरण असले तरी बक्षीस समारंभात त्यांची नाचक्की झाली. पाकिस्तानी कर्णधार अब्बास आफ्रिदीला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्यात आला, पण त्याने इंग्रजीऐवजी उर्दूमध्ये उत्तर देण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर त्याच्या उत्तराचा इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यासाठी आलेला अनुवादक देखील अडखळला. तो पाकिस्तानी खेळाडूचे बोलणे नीट, आत्मविश्वासपूर्वक इंग्रजीमध्ये सांगू शकला नाही आणि मध्येच अडखळला. यामुळे सोशल मीडियावर पाकिस्तानचा संघ आणि त्यांचा अनुवादक यांची छू थू होत आहे. पाकिस्तान संघातील खेळाडू आपल्या इंग्रजीमुळे अनेकदा ट्रोल होतात. या घटनेने पुन्हा एकदा इंग्रजी बोलण्यात पाकिस्तान खेळाडू किती कमजोर आहेत हे दिसून आले.
सामन्यादरम्यान कर्णधार अब्बास आफ्रिदीने स्पर्धेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केली. त्याने 5 सामन्यांमध्ये 142 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 330.23 होता, ज्यात 18 षटकारांचा समावेश होता. या प्रभावी कामगिरीमुळेच अब्बास आफ्रिदीला अंतिम सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' आणि संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ केल्याबद्दल 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्काराने गौरवण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.