US President Election: आणखी एक भारतीय अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत

पुढील वर्षी निवडणूक, निक्की हेली, विवेक रामास्वामी यांनीही केला आहे दावा
Hirsh Vardhan Singh
Hirsh Vardhan Singh google image
Published on
Updated on

US President Election: अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली आणि उद्योगपती विवेक रामास्वामी यांच्यानंतर आता आणखी एक भारतीय वंशाच्या नागरिकाचा अमेरिकच्या अध्यक्षपद निवडणुकीत समावेश झाला आहे.

हर्षवर्धन सिंग असे या नागरिकाचे नाव असून ते या शर्यतीत सहभागी होणारे तिसरा भारतीय अमेरिकन आहेत. अमेरिकेत पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.

38 वर्षीय हर्षवर्धन सिंग यांनी गुरुवारी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपली उमेदवारी जाहीर केली. त्यात त्यांनी स्वतःला रिपब्लिकन म्हटले आहे. त्यांनी 2017 मध्ये न्यू जर्सीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कंझर्व्हेटिव्ह विंगला पुन्हा उभे करण्यास मदत केली होती.

Hirsh Vardhan Singh
Goa Shipyard News: जहाज बांधणीसाठी AI चा वापर; गोवा शिपयार्डचा इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्ससोबत सामंजस्य करार

हर्षवर्धन सिंग यांनीही स्वत:ला केवळ अमेरिकन रक्ताचे उमेदवार म्हटले आहे. कोरोनाच्या काळातही हार न मानता अमेरिकन लोकांच्या हितासाठी काम केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

काही बदलांसाठी आणि अमेरिकन मुल्यांसाठी मजबूत नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मागण्याचे मी ठरवले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी फेडरल निवडणूक आयोगाकडे दाखल केला.

दरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत आता डोनाल्ड ट्रम्प, न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर क्रिस क्रिस्टी, फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस, माजी उपराष्ट्रपती माइक पेन्स, विवेक रामास्वामी, निक्की हेली, सिनेटर टिम स्कॉट आणि व्यापारी-पाद्री रायन बिंकले यांचा समावेश झाला आहे.

Hirsh Vardhan Singh
Pakistan Blast Video: पाकिस्तानात राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात स्फोट; 50 जण ठार, 200 हून अधिक जखमी

पुढील वर्षी जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान, रिपब्लिकन औपचारिकपणे त्यांच्या पक्षाच्या पुढील अध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड करतील. ही परिषद 15 ते 18 जुलै दरम्यान मिलवॉकी, विस्कॉन्सिन शहरात होणार आहे.

कोण आहेत हर्षवर्धन सिंह?

हर्षवर्धन सिंग यांनी 2009 मध्ये न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. ते व्यवसायाने अभियंता आहेत. 2017 मध्ये ते गर्व्हनरपदासाठी न्यू जर्सीच्या राजकारणात प्रवेश केला. मात्र, केवळ ते तिसऱ्या स्थानावर राहिले. 2003 मध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स आणि अॅस्ट्रोनॉटिक्सने त्यांना एव्हिएशन अॅम्बेसेडर म्हणून सन्मानित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com