Hindu Girl Kidnapped: पाकच्या सिंध प्रांतातून हिंदू मुलीचे अपहरण, 15 दिवसांत चौथी घटना

Pakistan Crime: पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हैदराबाद शहरात एका हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले आहे.
Girl
GirlDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan News: पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हैदराबाद शहरात एका हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, ती घरी परतत असताना हैदराबादच्या फतेह चौक परिसरातून तिचे अपहरण करण्यात आले. वृत्तानुसार, पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे, परंतु अद्याप मुलगी सापडलेली नाही. गेल्या पंधरा दिवसांतील अपहरणाची ही चौथी घटना आहे.

दरम्यान, 24 सप्टेंबर रोजी नसरपूर परिसरातून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. मीरपूरखास शहरात घरी परतत असताना आणखी एका मुलीचेही अपहरण करण्यात आले. त्याच शहरात रवी कुर्मी नावाच्या हिंदू व्यक्तीने आपल्या पत्नीचेही अपहरण केल्याचा आरोप केला आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी (Police) असा दावा केला की, रवीच्या पत्नीने इस्लाम धर्म स्वीकारला आणि अहमद चंडियो नावाच्या व्यक्तीशी स्वतःच्या इच्छेने लग्न केले.

Girl
Pakistan: इम्रान खान यांना कधीही होऊ शकते अटक, अरेस्ट वॉरंट जारी

अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिंदूंवरील अत्याचारात वाढ झाली आहे. या वर्षी जूनमध्ये, एका किशोरवयीन हिंदू मुलीने न्यायालयासमोर साक्ष दिली होती की, मला बळजबरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. त्यानंतर मुस्लिम पुरुषाशी माझे लग्न लावले. या घटनेच्या तीन महिन्यांपूर्वी तीन हिंदू (Hindu) मुलींवर असाच प्रकार घडला होता.

सुक्कूरमध्ये हिंदू मुलीची हत्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 21 मार्च रोजी सुक्कूरमध्ये पूजा कुमारी नावाच्या हिंदू मुलीची तिच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पूजाने पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न करण्याची ऑफर नाकारली होती.

Girl
Pakistan: 'मिफ्ताह इस्माईल' यांनी अर्थमंत्री पदाचा दिला राजीनामा

सक्तीच्या धर्मांतरणाविरोधातील विधेयकाचे काय झाले

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानमधील संसदीय समितीने सक्तीच्या धर्मांतराविरोधातील विधेयक नाकारले होते. तत्कालीन मंत्री नुरुल हक कादरी यांनी सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदा करण्यासाठी वातावरण अनुकूल नसल्याचे म्हटले होते.

Girl
Pakistan: इम्रान खान धास्तावले, नव्या लष्करप्रमुखाच्या नियुक्तीवरुन केले हे वक्तव्य

डॉनच्या वृत्तानुसार, कादरी यांनी असाही दावा केला होता की, सक्तीच्या धर्मांतराविरोधातील कायदा देशातील शांतता बिघडू शकतो आणि अल्पसंख्याकांना अधिक असुरक्षित बनवू शकतो. सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीच्या फॅक्टबुकनुसार, 2020 च्या आकडेवारीनुसार, हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक हे पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या केवळ 3.5 टक्के आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com