Pakistan: इम्रान खान यांना कधीही होऊ शकते अटक, अरेस्ट वॉरंट जारी

Former Prime Minister Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. इस्लामाबाद पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात मरगल्ला पोलिस ठाण्याच्या क्षेत्र दंडाधिकाऱ्यांनी माजी पंतप्रधानांविरुद्ध हे अटक वॉरंट जारी केले आहे. शुक्रवारी (30 सप्टेंबर) इम्रान खान इस्लामाबाद येथील सत्र न्यायालयात हजर झाले. त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांची माफी मागितली. खान यांनी एका प्रचारसभेत महिला न्यायाधीश जेबा चौधरी यांना धमकी दिली होती.

दरम्यान, 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील (Islamabad) एका रॅलीदरम्यान, इम्रान खान (Imran Khan) यांनी त्यांचे सहकारी शाहबाज गिल यांच्याबरोबर झालेल्या गैरवर्तवणूकीबद्दल उच्च पोलीस अधिकारी, निवडणूक आयोग आणि राजकीय विरोधकांवर गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली होती.

Imran Khan
Imran Khan: इम्रान खान बनले PM मोदींचे जबरा फॅन! या मुद्यावरुन पुन्हा केले कौतुक

काय म्हणाले इम्रान खान?

इम्रान खान यांनी न्यायाधीश जेबा चौधरी यांच्याबद्दल म्हटले होते की, 'त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार असल्याने त्यांनी स्वत: तयार राहावे.' दुसरीकडे, पोलिसांच्या (Police) विनंतीवरुन न्यायाधीश जेबा चौधरी यांनी शाहबाज गिल यांची दोन दिवसांची कोठडी मंजूर केली. रॅलीदरम्यान पोलीस उपमहानिरीक्षकांना आपण सोडणार नाही, अशी धमकीही इम्रान यांनी दिली होती.

Imran Khan
इम्रान खान यांनी रॅलीत प्ले केला एस जयशंकर यांचा Video, 'India कुणापुढे झुकत नाही'

माजी पंतप्रधानांवर गुन्हा दाखल

रॅलीनंतर 69 वर्षीय इम्रान खान यांच्यावर पोलीस, न्यायव्यवस्था आणि इतर राज्य संस्थांना धमकावल्याबद्दल दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणी इम्रान खान शुक्रवारी इस्लामाबाद येथील सत्र न्यायालयात हजर झाले. मी न्यायदंडाधिकारी जेबा चौधरी यांच्याकडे माफी मागण्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com