Pakistan Finance Minister Miftah Ismail
Pakistan Finance Minister Miftah IsmailDainik Gomantak

Pakistan: 'मिफ्ताह इस्माईल' यांनी अर्थमंत्री पदाचा दिला राजीनामा

Pakistan Finance Minister Miftah Ismail: पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता इशाक दार हे नवे अर्थमंत्री असतील.
Published on

आर्थिक संकटाचा सामना करणारे पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल (Mifta Ismail) यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. इशाक दार (Ishaq Dar) आता नवे अर्थमंत्री असणार आहेत. शनिवारी लंडनमध्ये पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि त्यांचे भाऊ नवाझ शरीफ यांच्यात झालेल्या बैठकीत डार यांना अर्थमंत्री बनवण्याचा औपचारिक निर्णय घेण्यात आला.

मिफ्ताह इस्माईल आणि इशाक दार यांच्याशिवाय पाकिस्तान (Pakistan) मुस्लिम लीग-नवाझचे इतर नेते या बैठकीत उपस्थित होते. इस्माईल यांनी आपल्या पदाचा राजीनामा नवाझ शरीफ यांना सुपूर्द केला. जे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरल्यामुळे राजकारणापासून दूर आहेत. परंतु त्यांचे निर्णय पक्षासाठी बंधनकारक मानले जातात.

Pakistan Finance Minister Miftah Ismail
Global Warming: जर्मन विद्यापीठाच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा - स्वच्छ हवेमुळे वाढते ग्लोबल वॉर्मिंग

दार लंडनहून पंतप्रधानांसोबत परतणार आहेत

"मी चार महिने माझ्या क्षमतेनुसार काम केले आणि पक्ष आणि देशाप्रती एकनिष्ठ राहिलो," असे पीएमएल-एनने एका निवेदनात इस्माईलला उद्धृत केले. पुढील आठवड्यात परत येऊन शपथ घेऊ शकतात. दार हे नवाझ शरीफ यांच्याशीही संबंधित आहेत. कारण त्यांच्या मुलाने माजी पंतप्रधान नवाज यांच्या मुलीशी लग्न केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com