मुसळधार पावसामुळे पाकिस्तानात 77 लोकांचा मृत्यू, मंत्री म्हणाले- राष्ट्रीय शोकांतिका

पाकिस्तानमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 77 जणांचा मृत्यू झाला आहे.
Pakistan
PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 77 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या बलुचिस्तान प्रांतात पावसामुळे 39 जणांचा मृत्यू झाला. देशाचे हवामान बदल मंत्री शेरी रहमान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पावसामुळे झालेल्या मृत्यूला “राष्ट्रीय शोकांतिका” म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मंत्री रहमान म्हणाले की, अतिवृष्टीमुळे दुर्गम भागात बचाव कार्यात देखील अडथळे येत आहेत. (Heavy rains in Pakistan have killed at least 77 people)

Pakistan
ब्रिटनमध्ये राजकीय संकट अधिक गडद! ​​बोरिस जॉन्सनच्या 39 मंत्र्यांनी दिला राजीनामा

मंत्री शेरी रहमान यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये लहान मुले, पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. सरकार राष्ट्रीय आणि प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या मदतीने पावसामुळे अडचणीत सापडलेल्या स्थानिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. पाण्याची पातळी जास्त असून लोकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कारण मान्सूनचा पॅटर्न बदलत चालला आहे. सध्या संपूर्ण पाकिस्तानमध्ये सरासरीपेक्षा 87 टक्के जास्त पाऊस पडला आहे.

मंत्री शेरी रहमान यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) राष्ट्रीय मान्सूनबाबत आकस्मिक योजना देखील तयार केली आहे. यापुढे होणारी जीवित व वित्तहानी टाळता यावी यासाठी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. मंत्री शेरी रहमान म्हणाल्या की, हे मृत्यू आणि विध्वंस रोखण्यासाठी या सर्वसमावेशक योजनेची गरज आहे. कारण हा सर्व विनाश हवामान बदलामुळेच होत आहे.

Pakistan
या देशात खासगी Island विकणे आहे, 'मात्र...'

तर पाकिस्तानच्या हवामान विभागाच्या (पीएमडी) म्हणण्यानुसार पाऊस 8 जुलैपर्यंत कायम राहील. हवामान खात्याने सांगितले की, सिंधच्या दक्षिण भागात हवेचा कमी दाब निर्माण झाला असून, उत्तर अरबी समुद्रातून आर्द्रता निर्माण होत आहे. दरम्यान, 12 ते 13 लोकांच्या मृत्यूनंतर, बलुचिस्तान सरकारने क्वेटाला आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित केले आणि प्रांतीय राजधानीत आणीबाणी लागू केली आहे. मुसळधार पावसामुळे बलुचिस्तान प्रांतातील नद्या आणि कालवे देखील फुटले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com