Putin And Zelensky: पुतिन-झेलेन्स्की येणार एकाच मंचावर?

इंडोनेशियात 15-16 नोव्हेंबर रोजी जी-२० समिटमध्ये पुतिन आल्यास झेलेन्स्कीही सहभागी होणार
Putin and Zelensky
Putin and Zelensky Dainik Gomantak
Published on
Updated on

Putin And Zelensky: एकीकडे रशिया-युक्रेन युद्धाला सुरवात होऊन 8 महिने पुर्ण व्हायला आलेली असताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलन्स्की हे एकाच मंचावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Putin and Zelensky
Nobel Peace Prize 2022: यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार एका व्यक्तीसह दोन संघटनांना जाहीर

इंडोनेशियातील बालीमध्ये येत्या 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी जी-20 राष्ट्रांचे समिट होत आहे. या समिटमध्ये पुतिन सहभागी झाल्यास झेलेन्स्की देखील येथे येणार आहेत. असे झाले तर रशिया-युक्रेन युद्धाला सुरवात झाल्यानंतर या दोन्ही राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष प्रथमच एका मंचावर एकत्र दिसतील.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन देखील या समिटमध्ये सहभागी होतील. शिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यात सहभागी होण्याची शक्यता आहे. कारण त्यानंतरची म्हणजे 2023 मधील जी-20 परिषद ही भारतात होणार आहे. जगभरातील अनेक राष्ट्रांध्यक्षांनी आत्तापर्यंत पुतिन यांन युद्ध संपविण्याची विनंती केली आहे. तथापि, हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

Putin and Zelensky
Baba Vanga: सावधान भारतीयानों! येत्या 3 महिन्यात येऊ शकतं मोठं संकट

पुतिन आणि झेलेन्स्की हे दोन्ही नेते या परिषदेला उपस्थित राहतील, असे वृत्त संयुक्त अरब अमिरातीतील एका वृत्तपत्राने इंडोनेशियाचे राजदूत हुसैन बागीस यांच्या हवाल्याने दिले आहे. या समिटमध्ये दोन गेस्ट नेशन्स आहेत. त्यातील एक आहे संयुक्त अरब अमिरात आणि दुसरा आहे युक्रेन. ही दोन्ही राष्ट्रे जी-20 चे सदस्य नाहीत.

तथापि, रशिया किंवा युक्रेन कडून याला दुजोरा मिळू शकलेला नाही. काही दिवसांपुर्वीच व्हाईट हाऊसनेही म्हटले होते की, पुतिन या परिषदेसाठी आले तर झेलेन्स्की यांनाही बोलावले जाईल. त्यासाठी विशेष प्रयत्नही केले जात आहेत. जर हे दोन्ही नेते या परिषदेसाठी आले तर त्यांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबवले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com