Nobel Peace Prize 2022: यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार एका व्यक्तीसह दोन संघटनांना जाहीर

अॅलेस बियालियात्सकी यांच्यासह रशिया आणि युक्रेनमधील मानवाधिकार संघटनांचा गौरव
Nobel Peace Prize 2022
Nobel Peace Prize 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

Nobel Peace Prize 2022: या वर्षींचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार एक व्यक्ती आणि दोन संघटनांना जाहीर झाला आहे. बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. अॅलेस बियालियात्सकी (Ales Bialiatski) आणि रशियातील मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या संघटनेला देण्यात आला आहे.

Nobel Peace Prize 2022
Nobel In Literature: फ्रेंच लेखिका अॅनी अर्नो यांना नोबेल जाहीर

नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मेमोरिलय आणि सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन्ही संघटना मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी काम करतात.

कोण आहेत अॅलेस बियालियात्सकी ?

अॅड. अॅलेस बियालियात्सकी यांनी 1980 मध्ये बेलारूसमधील हुकुमशाहीविरोधात लोकशाही चळवळीची सुरुवात केली होती. ते आजतागायत स्वतःच्या देशात खरी लोकशाही आणण्याासाठी झगडत नाहीत. रशिया-युक्रेन युद्धात बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना पाठिंबा दिला आहे.

अॅलेस यांनी विसाना या नावाची संघटना उभारली आहे. ही संघटना अटक करून तुरूंगात टाकलेल्या लोकशाहीवादी समर्थकांना कायदेशीर मदत पुरविण्याचे काम करते. 2011 ते 2014 या काळात अॅलेस तुरूंगात होते. 2020 मध्येही त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते आजतागायत तुरूंगात आहेत.

Nobel Peace Prize 2022
Nobel Prize In Chemistry: बेरटोझी, मेलडॉल, शार्पलेस यांना केमिस्ट्रीचे नोबेल जाहीर

रशियातील मेमोरियल ह्युमन राईट संघटना

रशियातील मेमोरियल ही ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन 1987 मध्ये स्थापन झाली होती. तेव्हा रशियाचे विघटन झालेले नव्हते. तेव्हा रशिया हा सोव्हिएत संघ होता. या संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी आंद्रेई सखारोव्ह आणि ह्युमन राईट्स वकील स्वेतलाना गनुशकिना यांनाही यापुर्वी नोबेल पुरस्कारान गौरविण्यात आले आहे.

सोव्हिएत संघाचे 15 तुकड्यात विघटन झाल्यानंतर ही संघटना रशियाची सर्वात मोठी मानवाधिकार संघटना बनली. या संघटनेने स्टॅलिनच्या काळापासून ते आत्तापर्यंत राजकीय कैद्यांसाठी काम केले आहे. रशियाने जेव्हा चेचेन्यावर हल्ला केला आणि त्यात 2009 मध्ये या संघटनेच्या नतालिया एस्तेमिरोव्हा मारल्या गेल्या. त्यानंतर या संघटनेने जागतिक पातळीवर आवाज उठवला होता. रशियन सरकार या संघटनेला परदेशी हेरांची संघटना असे म्हणून हिणवतो.

Nobel Peace Prize 2022
Nobel In Physics: क्वांटम इन्फर्मेशनवर संशोधन करणाऱ्या तिघा शास्त्रज्ञांना पदार्थविज्ञानाचे नोबेल

युक्रेनमधील सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज

युक्रेनची राजधानी कीव्ह येथे 2007 मध्ये ही संघटना स्थापन झाली होती. युक्रेनमध्ये लोकशाही बळकट करणे हा या संस्थेचा उद्देश होता. संघटनेच्या मतानुसार, युक्रेनमध्येही अद्यापही लोकशाही नीट रुजलेली नाही. त्यामुळेच या संघटनेने युक्रेनला इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा हिस्सा बनले पाहिजे, असे वाटते.

याच वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा या संघटनेने वॉर क्राईमच्या प्रकरणांची तपासणी केल. आता ही प्रकरणे आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल केली जात आहेत.

दरम्यान, शांततेच्या पुरस्कारांचे वितरण नॉर्वेमध्ये केले जाते. तर उर्वरीत नोबेल पुरस्कारांचे वितरण स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे होईल. 3 ऑक्टोबर रोजी सुरू झालेला नोबेल वीक 10 ऑक्टोबरपर्यंत चालेल. 10 ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. डिसेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com