Hamza Bin Laden: ओसामा बिन लादेनचा मुलगा 'हमजा' जिवंत? अल-कायदाच्या 50 मिनिटांच्या व्हिडिओनं खळबळ; जागतिक गुप्तचर संस्था सतर्क VIDEO

Al-Qaeda Propaganda Video: अमेरिकेवर झालेल्या 9/11च्या विनाशकारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणात आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली.
Al-Qaeda Propaganda Video
Hamza Bin LadenDainik Gomantak
Published on
Updated on

Hamza Bin Laden Video: अमेरिकेवर झालेल्या 9/11च्या विनाशकारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणात आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली. कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन जिवंत असल्याचे संकेत देणारा एक नवीन व्हिडिओ समोर आला. अल-कायदाची अधिकृत मीडिया विंग असलेल्या 'अस्-सहाब'ने 50 मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, यामध्ये हमजा स्पष्टपणे दिसत आहे.

विशेष म्हणजे, 2019 मध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ अमेरिकेच्या (America) लष्करी कारवाईत हमजा मारला गेल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या ताज्या व्हिडिओतील अनोखे फुटेज आणि हमजाची उपस्थिती यामुळे तो जिवंत असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले.

Al-Qaeda Propaganda Video
Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

'11 सप्टेंबरच्या हल्ल्याची 25 वर्षे' असे नाव देण्यात आलेल्या या 50 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अल-कायदाचा माजी प्रमुख अयमान अल-जवाहिरीचे काही न पाहिलेले दुर्मिळ फोटोही दाखवण्यात आले आहेत. अमेरिकन कारवाईत मारल्या गेलेल्या जवाहिरीच्या मृत्यूबद्दल अल-कायदाने अद्याप कोणतीही अधिकृत कबुली किंवा श्रद्धांजली दिलेली नाही. जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हमजा बिन लादेन हा पारंपारिक पांढऱ्या रंगाची पगडी घालून, मातीच्या भिंतीसमोर बसलेला दिसत आहे आणि त्याच्या शेजारी एक असॉल्ट रायफल ठेवलेली आहे.

Al-Qaeda Propaganda Video
Pakistan Army: 'पाकिस्तानी लष्कर दहशतवादी संघटनेसारखं...', पत्रकाराचा दावा; आसिम मुनीरबाबत माजी लष्करप्रमुखाची 'ती' चेतावणी ठरली खरी

गुप्तचर संस्थांच्या मते, हमजाला अशा प्रकारे समोर आणण्यामागे अल-कायदाचे दोन मुख्य उद्देश आहेत, एक म्हणजे ओसामा बिन लादेनचा खरा वारसदार म्हणून हमजाची घोषणा करणे आणि दुसरे म्हणजे अल-कायदाच्या कट्टरपंथी विचारसरणीचा प्रसार करुन नवीन दहशतवाद्यांची भरती करणे.

Al-Qaeda Propaganda Video
Pakistan Independence Day Viral: गाड्या अडवल्या, एकमेकांना बदडलं अन् बाटल्या मारल्या... पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनी धुडगूस; व्हायरल व्हिडिओवर लोक म्हणाले, "आमची जनताच अडाणी!"

या संपूर्ण व्हिडिओची सुरुवातच अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक दृश्यांनी करण्यात आली. व्हिडिओच्या सुरुवातीला कोणत्याही आंतरराष्ट्रीय मोहिमेऐवजी सप्टेंबर 2014 मध्ये कराची येथील नौदल डॉकयार्डवर 'अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेन्ट'ने केलेल्या हल्ल्याचे फुटेज दाखवण्यात आले. अल-कायदाचा सध्याचा प्रमुख सैफ अल-अद्ल याने संघटनेत नवीन भरती करण्यासाठी आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हमजा बिन लादेनच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर केल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिकन आणि जागतिक गुप्तचर यंत्रणा आता या व्हिडिओच्या सत्यतेची आणि हमजा बिन लादेनच्या सध्याच्या ठिकाणाची अत्यंत गांभीर्याने तपासणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com