VIDEO: गाड्या अडवल्या, एकमेकांना बदडलं अन् बाटल्या मारल्या... पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनी धुडगूस; व्हायरल व्हिडिओवर लोक म्हणाले, "आमची जनताच अडाणी!"

Pakistan Independence Day Chaos Viral Video: पाकिस्तानात (14 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन साजरा होत असतानाच, देशातील विविध शहरांतून समोर आलेल्या हुल्लडबाजी आणि गोंधळाच्या व्हिडिओमुळे पाकड्यांची जगात पुन्हा एकदा नाचक्की झाली.
Pakistan Independence Day Chaos Viral Video
Pakistan Independence Day Chaos Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Independence Day Chaos Viral Video: पाकिस्तानात (14 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन साजरा होत असतानाच, देशातील विविध शहरांतून समोर आलेल्या हुल्लडबाजी आणि गोंधळाच्या व्हिडिओमुळे पाकड्यांची जगात पुन्हा एकदा नाचक्की झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्यांवर लोक बॉटल्स फेकून मारताना, आपापसात हाणामारी करताना आणि गाड्या अडवून रस्त्यांवर गोंधळ घालताना दिसत आहेत.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नेटिझन्सनी आणि खुद्द पाकिस्तानातील नागरिकांनी या सर्व प्रकाराला 'मूर्खपणाचा उत्सव' असे संबोधत आपल्याच जनतेच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका केली.

लाहोरच्या लिबर्टी चौकापासून ते इस्लामाबादच्या मुख्य रस्त्यांपर्यंत रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले होते. मात्र, देशभक्तीचा आणि राष्ट्रीय अभिमानाचा उत्सव साजरा करण्याऐवजी रस्त्यांवर गुंडगिरी आणि असभ्य वर्तन पाहायला मिळाले. पाकिस्तानातील अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, "आपली अशिक्षित आणि हुल्लडबाज जनता अजिबात आदरास पात्र नाही. गरीब जन्माला येणे हा गुन्हा नाही, पण असे अडाणी आणि उनाड राहणे हा पूर्णपणे त्यांचाच दोष आहे." अनेक युजर्संनी सरकारला दोष देण्यापूर्वी देशातील जनतेने स्वतःच्या वर्तनात सुधारणा केली पाहिजे, असा सल्लाही दिला.

या सगळ्या गोंधळात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे रस्त्यांवर फक्त पुरुषांचीच उपस्थिती होती. यावर एका महिला युजरने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करत लिहिले की, "स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर एकही महिला आनंद साजरा करताना का दिसत नाही? स्वातंत्र्य फक्त पुरुषांसाठीच आहे का? पुरुषांनी रस्त्यावर उभे राहायचे आणि महिलांनी फक्त बाल्कनीतून पाहायचे का?" या कमेंटमुळे पाकिस्तानातील (Pakistan) महिलांचे स्वातंत्र्य आणि सार्वजनिक ठिकाणांवरील त्यांची सुरक्षा यावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरु झाली.

2021 मध्ये लाहोरच्या मिनार-ए-पाकिस्तान येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच एका महिलेचा हजारो पुरुषांच्या टोळक्याने विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली होती. यावर्षी पुन्हा एकदा समोर आलेल्या या हिंसक आणि बेधुंद व्हिडिओमुळे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला हुल्लडबाजीचे गालबोट लागले असून, जगभरातून त्यांच्यावर थु-थु होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com