VIDEO: चालत्या कारला केलं लक्ष्य, बॉम्ब थेट गाडीवर आदळला, 7 ऑक्टोबरच्या नरसंहाराचा मास्टरमाईंड 'राद साद' ठार; इस्रायली सैन्याने हवाई हल्ल्यात घेतला बदला

Isreal Hamas War: इस्रायली सुरक्षा दलांना हमासविरुद्धच्या संघर्षात एक मोठी आणि निर्णायक सफलता मिळाली.
Raad Saad elimination
Raad Saad eliminationDainik Gomantak
Published on
Updated on

Isreal Hamas War: इस्रायली सुरक्षा दलांना हमासविरुद्धच्या संघर्षात एक मोठी आणि निर्णायक सफलता मिळाली. इस्रायली सैन्याने केलेल्या अत्यंत अचूक हवाई हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर आणि 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या भीषण हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार राद साद याचा खात्मा केला. राद साद हा हमासच्या लष्करी विंकचा 'वेपन चीफ कमांडर' होता आणि तो हमासच्या उच्च-स्तरीय नेतृत्वातील एक महत्त्वाचा दुवा मानला जात होता.

आयडीएफने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर राद सादला लक्ष्य करुन केलेल्या या कारवाईची माहिती दिली, तसेच या अचूक हवाई हल्ल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला.

Raad Saad elimination
Israel Hamas War: 'दररोज मानसिक आणि शारीरिक छळ होत होता…'; इस्रायलने गाझामधून 55 कैद्यांची केली सुटका!

7 ऑक्टोबर नरसंहारातील प्रमुख सूत्रधार

आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, राद साद हा केवळ हमासच्या (Hamas) लष्करी युनिटमधील शस्त्र उत्पादन मुख्यालयाचा प्रमुख नव्हता, तर तो 7 ऑक्टोबरच्या नरसंहाराच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक होता. या घटनेत हजारो निरपराध इस्रायली नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. गाझामध्ये हमासचे जे काही अंतिम अनुभवी वरिष्ठ दहशतवादी शिल्लक आहेत, त्यापैकी साद हा एक होता.

हमासच्या लष्करी युनिटचा उपप्रमुख मारवान ईसा याचा तो अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी होता. सादने संघटनेत अनेक वरिष्ठ पदे सांभाळली होती आणि हमासच्या लष्करी नेतृत्वात त्याचे स्थान अतिशय महत्त्वाचे होते. मात्र त्याच्या खात्म्यामुळे हमासची भविष्यात आपली क्षमता पुन्हा स्थापित करण्याची योजना विस्कळीत होणार आहे, असे आयडीएफने स्पष्ट केले.

Raad Saad elimination
Israel Hamas War: आधी वडील, नंतर मुलगा अन् चुलत भावाने इस्त्रायली महिलेवर केला अत्याचार; हमासच्या क्रूरतेची आणखी एक कबुली- Video

इस्रायली सैनिकांच्या हत्येशी थेट संबंध

राद साद हा अनेक गंभीर गुन्ह्यांसाठी जबाबदार होता. युद्धकाळात हमासच्या हल्ल्यात अनेक इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आणि या हत्येसाठी साद थेट जबाबदार होता.

विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात सादने हमासच्या लष्करी युनिटमध्ये मोठी आणि निर्णायक भूमिका बजावली होती. यात त्याने युद्धविराम कराराचे उल्लंघन करण्यात सक्रिय सहभाग घेतला होता. इतकेच नाही, तर युद्धविराम काळातही गाझामध्ये शस्त्रास्त्रांचे उत्पादन अखंडपणे सुरु राहील, याची देखरेख व व्यवस्थापन तो करत होता. मात्र त्याचा खात्मा होणे हे हमाससाठी एक मोठा आणि भरुन न येणारा धक्का आहे.

Raad Saad elimination
Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

हवाई हल्ल्याची अचूकता आणि दहशतवाद्यांमध्ये खळबळ

आयडीएफने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये राद सादचा खात्मा कसा करण्यात आला, याची दृश्ये स्पष्टपणे दिसतात. व्हिडिओमध्ये हमासचा टॉप दहशतवादी राद साद याचा ताफा गाझातील एका ठिकाणाहून जात असताना दिसत होता. सादला अनेक सशस्त्र दहशतवादी इतर वाहनांमधून एस्कॉर्ट करत होते.

मात्र, याच दरम्यान इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला इतका जबरदस्त आणि अचूक होता की, त्यांनी थेट राद सादच्या चालत्या कारला लक्ष्य केले. बॉम्ब थेट सादच्या कारवर येऊन आदळला. काही सेकंदांतच सर्व काही नष्ट झाले. कार स्फोटात उडून गेली. साद जागीच ठार झाला. सादला एस्कॉर्ट करणाऱ्या इतर हमासच्या दहशतवाद्यांमध्ये या हल्ल्यानंतर एकच खळबळ आणि गोंधळ उडाला.

Raad Saad elimination
Israel-Hamas War: हवेत गनपावडरचा वास, धुराचे ढग... आठवडाभराच्या शांततेनंतर गाझामध्ये रक्तरंजित खेळ सुरु; 1 तासात 29 जणांचा मृत्यू!

इस्रायली सैन्याने अत्यंत कुशलतेने आणि अचूकतेने ही कारवाई करुन हमासच्या उच्च स्तरावरील नेतृत्वाला लक्ष्य केले. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार मारला गेल्यामुळे इस्रायली सैन्याला मोठे नैतिक बळ मिळाले असून हमासच्या क्षमतेवर मोठा आघात झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com