Israel Hamas War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, अनेक घरांवर डागली क्षेपणास्त्रे; लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले (Air Strikes) करत आहे.
Israel Hamas War
Israel Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले (Air Strikes) करत आहे. यातच आता, इस्रायलने (Israel) पुन्हा एकदा गाझावर हवाई हल्ला केला आहे. रफाह (Rafah) शहरातील इस्रायली हवाई हल्ल्यात 13 लोक ठार आणि अनेक जण जखमी झाले.

तथापि, हमासच्या प्रसारमाध्यमांनी मृतांची संख्या 15 असल्याचे सांगितले. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायली विमानांनी गाझा (Gaza) शहरातील तीन घरांना लक्ष्य केले आणि अनेक लोक ठार आणि जखमी झाले. इस्रायलच्या आतापर्यंतच्या हल्ल्याने 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी रफाहमध्ये आश्रय घेतला आहे, जिथे इस्रायलवर हल्ले केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, गेल्या शनिवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 22 पॅलेस्टिनी ठार झाले होते. इस्रायली विमानांनी मध्य गाझामधील नुसिरत निर्वासित शिबिरातील एका लोकवस्तीवर अनेक क्षेपणास्त्रे डागली, ज्यामध्ये 4 मुलांसह 9 पॅलेस्टिनी ठार आणि 30 जण जखमी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हवाई हल्ल्याने गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील एका घरालाही लक्ष्य केले. यामध्ये 4 मुलांसह 6 पॅलेस्टिनी ठार तर 8 जण जखमी झाले.

Israel Hamas War
Israel Hamas War: ''आम्ही युद्धविरामासाठी तयार आहोत, पण...''; हमासच्या लीडरने इस्त्रायलसमोर ठेवली ही अट

गाझामधील 25 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले

वृत्तानुसार, लढाऊ विमानांनी राफाहच्या उत्तरेकडील नासेर परिसरातील एका घराला लक्ष्य केले, ज्यामध्ये 7 पॅलेस्टिनी ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. जखमींना शहरातील अबू युसूफ अल-नज्जर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते अविचाई अद्राई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, लढाऊ विमानांनी लष्करी इमारती, शस्त्रास्त्रांची गोदामे आणि अनेक इमारतींसह गाझामधील 25 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. दुसरीकडे, हमासने गाझामध्ये पकडलेल्या आणखी दोन ओलिसांच्या जिवंत असल्याचा पहिला पुरावा दाखवणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जबरदस्तीने चित्रित केलेल्या फुटेजमध्ये, ओमरी मिरन म्हणतो की त्याला 202 दिवसांसाठी ओलिस म्हणून ठेवण्यात आले.

गाझामध्ये आतापर्यंत 34,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला

गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने गाझा येथून इस्रायलवर (Israel) रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात 1,200 हून अधिक लोक मारले गेले आणि सुमारे 240 जणांचे अपहरण झाले. दरम्यान, इस्रायलनेही प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरु केले आणि गाझाची संपूर्ण नाकेबंदी करण्याचे आदेश दिले. हमासचा पूर्णपणे नायनाट करण्याचा आणि ओलीसांची सुटका करण्याच्या उद्दिष्टासह इस्त्रायलने जमीनी कारवाई सुरु केली.

Israel Hamas War
Israel Hamas War: इस्रायली लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा राजीनामा; हमासचा हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याची स्वीकारली जबाबदारी

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाझामध्ये आतापर्यंत 34,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. 24 नोव्हेंबर रोजी, कतारने (Qatar) इस्रायल आणि हमास यांच्यात तात्पुरता युद्धविराम करुन काही कैदी आणि ओलीस यांची देवाणघेवाण केली. गाझामध्ये मानवतावादी मदत पाठवण्याबाबतचा करारही केला. युद्धविराम काही दिवसांसाठी वाढवण्यातही आला. मात्र,1 डिसेंबर रोजी त्याची मुदत संपली. गाझामध्ये हमासने 100 हून अधिक ओलीस ठेवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com