Israel Hamas War: ‘’7 ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला तेव्हा...’’; ‘ऑल आइज ऑन राफाह’ मोहिमेवर भडकला इस्त्रायल

Israel Hamas War: गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेलं इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाहीये.
PM Benjamin Netanyahu
PM Benjamin NetanyahuDainik Gomantak

Israel Hamas War: गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेलं इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. नुकताच त्याने राफाह शहरावर मोठा हल्ला केला, ज्यामध्ये शेकडो लोक आतापर्यंत मारले गेले. दुसरीकडे मात्र, इस्त्रायलने हमासचा जोपर्यंत सर्वनाश होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही अशी शपथ घेतली आहे.

दरम्यान, राफाह शहरावर इस्त्रायलने (Israel) हल्ला केल्यानंतर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर राफाह शहरावर करण्यात आलेल्या हल्ल्याकडे लक्ष वेधण्यासाठी मोहिम राबवण्यात आली. 'ऑल आइज ऑन राफाह' मोहीम सोशल मीडियावर जगभरात ट्रेंड करत आहे. सेलिब्रेटी, खेळाडू आणि लाखो सोशल मीडिया यूजर्स युद्धग्रस्त राफाहवरील इस्रायलच्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोहिमेत भाग घेत आहेत. लोक पॅलेस्टाईनसोबत असल्याचा संदेश देत आहेत. 26 मे रोजी इस्त्रायली हवाई हल्ल्यात राफाहमधील निर्वासित सेंटरमधील लहान मुलांसह 45 नागरिक ठार झाले. या घटनेनंतर इस्त्रायलवर जगभरातून टिकेचा भडिमार सुरु झाला.

PM Benjamin Netanyahu
Israel Hamas War: अनेकजण जिवंत जळाले, गाझा नंतर राफाहमध्ये इस्रायली नरसंहार; 24 तासांत 160 जणांचा मृत्यू

आता या मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने एक फोटो शेअर केला आहे. ज्याच्या मध्यमातून इस्त्रायलने ही मोहिम राबवणाऱ्या लोकांना विचारले आहे की, 7 ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला तेव्हा तुम्ही कुठे पाहात होतात? इस्रायलने पुढे विचारले की, तुम्ही हमासच्या हल्ल्याबाबत पोस्ट का केली नाही? 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात सुमारे 1,160 लोक मारले गेले. यातील बहुतांश नागरिक होते. हमासने सुमारे 250 लोकांना ओलीसही ठेवले. दहशतवाद्यांनी पकडले असताना आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.

सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म X वर इस्रायलच्या अधिकृत पेजवर एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, "7 ऑक्टोबर रोजी तुम्ही कुठे पाहात होतात? फोटोमध्ये हमासचा दहशतवादी एका निष्पाप मुलासमोर बंदूक घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. इस्रायलने पोस्टवरील कॅप्शनमध्ये आपला हेतूही स्पष्ट केला आहे. आम्ही 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्याबाबत बोलणे थांबवणार नाही. आम्ही अपहरण करण्यात आलेल्या इस्त्रायली नागरिकांबद्दल बोलणे थांबवणार नाही."

PM Benjamin Netanyahu
Israel Hamas War: आधी वडील, नंतर मुलगा अन् चुलत भावाने इस्त्रायली महिलेवर केला अत्याचार; हमासच्या क्रूरतेची आणखी एक कबुली- Video

इस्रायलने निर्वासितांच्या सेंटरवरील हल्ला नाकारला

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल लष्करी कारवाईत गाझामध्ये किमान 36 हजार लोक मारले गेले आहेत. व्यापक टीकेनंतर, इस्रायलने राफाहमधील निर्वासितांच्या सेंटरवरील हल्ल्याचा आरोप फेटाळून लावला. हमासच्या सेंटरवर रॉकेट आदळल्यामुळे आग लागल्याचे त्यांनी सांगितले.

'ऑल आइज ऑन राफाह' मोहिमेने सोशल मीडियावर जोर धरला आहे. आतापर्यंत जवळपास 45 दशलक्ष यूजर्संनी ते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या मोहिमेचा प्रचार केला आहे. सोशल मीडियवरील मोहिमेनंतर इस्रायलनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com