
ब्रेकअप बऱ्याचवेळा भावनिकदृष्ट्या त्रासदायक गोष्ट ठरते. ब्रेकअप मानसिक शांती हिरावून घेते. या फेझमध्ये अनेकजण जीवन बदलणारे निर्णय देखील घेतात. असेच काहीसे एका २७ वर्षीय अभियंत्यासोबत घडले. या इंजिनिअरने सर्जनशीलता आणि उद्योजकतेसाठी गुगलमधील करोडो पगाराची नोकरी सोडली.
सॉफ्टवेअर इंजिनिअर जिम टँग यांनी अलीकडेच बिझनेस इनसाइडरला मुलाखत दिली. जिम टँग यांनी गुगलची मोठ्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय कसा घेतला, याची माहिती त्याने दिली. ब्रेकअप तसेच, कॉर्पोरेट कारकिर्दीतील वाढत्या निराशेनंतर टाँग यांनी हा निर्णय घेतला. जिम टँग यांनी २.५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त (३ लाख डॉलर्स) वार्षिक पगाराची नोकरी सोडली. टँग यांनी २०२१ मध्ये गुगलमध्ये नोकरी सुरु केली होती.
सुरुवातीला गुगलमधील नोकरी त्यांच्यासाठी स्वप्नातील नोकरी वाटत होती. या नोकरीतून त्यांचे मोठ्या पगाराची अमेरिकेतील स्वप्न पूर्ण होईल आणि कुटुंबाला देखील त्याचा अभिमान वाटेल, अस त्यांना वाटले होते. पण, या नोकरीत मोठा पगार आणि उत्तम सुविधा असूनही वैयक्तिक समाधान नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. ४० व्या वर्षी निवृत्त होऊन निवांत आयुष्य जगण्याचा त्यांचा मानस होता.
पण, त्यांचे अचानक ब्रेकअप झाले आणि त्यांच्या आयुष्य आणि कारकिर्दीला वेगळं वळण मिळाले. मे २०२५ मध्ये, सुट्टी घेऊन त्यांनी विविध ठिकाणी प्रवास केला. याकाळा त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक ध्येयांवर खोलवर चिंतन केले. खोलवर चिंतन केल्यानंतर त्यांना अधिक समाधानकारक आणि अर्थपूर्ण जीवन हवं असल्याचा निष्कर्ष काढला. पण, अशा आयुष्याचा त्यांनी निवृत्तीनंतर विचार केला होता.
गुगलमधून राजीनामा दिल्यानंतर, तांग यांनी Digital Nomad चे जीवन स्वीकारले. टोकियोमध्ये त्यांनी प्रवास सुरू केला जिथे त्यांनी एक निर्माता आणि व्यावसायिक म्हणून त्याचे अनुभव वापरण्यास सुरुवात केली. तो आता स्वतःची डिजिटल उत्पादने तयार करण्यावर आणि कोचिंग सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
नव्या कामांत त्यांना अधिक आनंद आणि समाधान मिळत असल्याचे तांग यांनी सांगितले. तसेच, यामुळे आयुष्य देखील अर्थपूर्ण वाटत असल्याचे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.