Google चा कर्मचाऱ्यांना झटका; 12,000 कर्मचारी कपात करण्याची केली घोषणा

पिचाई यांनी कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनाही मदत जाहीर केली आहे.
Google
GoogleDainik Gomantak
Published on
Updated on

आर्थिक परिस्थितीचा दाखला देत Google ची मूळ कंपनी Alphabet ने शुक्रवारी जागतिक स्तरावर सुमारे 12,000 कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली. म्हणजेच, कंपनी जागतिक कर्मचार्‍यांपैकी 6 टक्के कर्मचारी कमी करणार आहे.

"कपात केलेल्या कर्मचाऱ्यांप्रती मी सहानुभूती व्यक्त करतो. या क्षणी आपण जिथे आहोत त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेत आहे." असे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे. तसेच, पिचाई यांनी कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनाही मदत जाहीर केली आहे.

Google
Pakistan-Russia: 'ऐसा कोई सगा नही...', PAK कडून फसवणूक होऊनही रशियाने उचलले हे पाऊल

याबाबत बातमी कंपनीच्या न्यूज ब्लॉगवर देखील प्रकाशित करण्यात आली आहे. कंपनीची आजची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. असे पिचाई म्हणाले आहेत.

ज्या कर्मचारी कपात करण्यात आली आहे त्यांना 2022 चा बोनस आणि सुट्टीचे उर्वरित पैसे दिले जाणार आहेत. यासोबतच 60 दिवसांचा अतिरिक्त पगारही दिला जाणार आहे. कंपनीने सांगितले की ते Google वर प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी 16 आठवड्यांच्या पगारासह दोन आठवड्यांपासून सुरू होणारे विच्छेदन पॅकेज ऑफर केले जाणार.

यासोबतच काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची आरोग्य सुविधा, जॉब प्लेसमेंट सेवा आणि इतर मदत दिली जाणार आहे.

Google
Vladimir Putin: पुतिन यांनी PAK ला पाठवला खास संदेश, दक्षिण आशियाबद्दल...!

अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मेमो नोटमध्ये म्हटले आहे की, "गुगलर्स, माझ्याकडे खूप वाईट बातमी आहे. आम्ही सहा टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे 12,000 कर्मचारी कमी होतील. आम्ही याआधीच यूएसमधील कर्मचार्‍यांना एक वेगळा ईमेल पाठवला आहे."

"निर्णयाचा मला खूप खेद वाटतो. आम्ही घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. आम्ही गेल्या दोन वर्षांत आश्चर्यकारक काम केले आहे, आणि आम्ही खूप प्रगती केली आहे."

"आमच्या ध्येयाची ताकद, आमची उत्पादने आणि सेवांचे मूल्य यामुळे मी आमच्यासमोर मला मोठ्या संधी दिसत आहेत, आणि एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) मधील आमची सुरुवातीची गुंतवणूकीत मला संधीची खात्री आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com