Pakistan-Russia: 'ऐसा कोई सगा नही...', PAK कडून फसवणूक होऊनही रशियाने उचलले हे पाऊल

Pakistan-Russia Oil Deal: शाहबाज सरकार आवश्यक तेलांपैकी 35 टक्के तेल रशियाकडून खरेदी करणार आहे.
Shehbaz Sharif & Vladimir Putin
Shehbaz Sharif & Vladimir PutinDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan-Russia Oil Deal: एकीकडे पाकिस्तान युक्रेनला शस्त्रे पुरवून रशियाची फसवणूक करत आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने मार्च महिन्यापासून रशियाकडून स्वस्त तेल आयात करणार असल्याची घोषणा केली आहे. शाहबाज सरकार आवश्यक तेलांपैकी 35 टक्के तेल रशियाकडून खरेदी करणार आहे. याशिवाय, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचाही संदेश मिळाला आहे.

दरम्यान, पुतिन यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासोबतच गुंतवणूक आणि व्यापार वाढवण्यात रशियाच्या हिताचा पुनरुच्चार केला.

त्याचवेळी पुतिन म्हणाले की, आम्ही इस्लामिक जगत आणि दक्षिण आशियातील एक महत्त्वाचा भागीदार म्हणून पाकिस्तानकडे पाहत आहोत.

Shehbaz Sharif & Vladimir Putin
Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युध्दादरम्यान भारताची मोठी तेल खरेदी, रशियाने...

द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पुतीन यांचा हा संदेश रशियाचे ऊर्जा मंत्री निकोले शुल्गिनोव यांनी दिला आहे. लाहोरमध्ये त्यांनी शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. वास्तविक, आज रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील आंतर-सरकारी आयोगाच्या बैठकीची 8 वी फेरी आहे.

तसेच, शुल्गिनोव्ह हे रशियन शिष्टमंडळाचे अध्यक्ष आहेत. अहवालानुसार, दोन्ही देशांनी स्वस्त दरात पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्याबाबत चर्चा केली. याशिवाय, रशियाकडून (Russia) पाकिस्तानला होणारा गॅस आणि तेलाचा पुरवठा याशिवाय गॅस पाइपलाइन प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला.

Shehbaz Sharif & Vladimir Putin
Russia Ukraine War: युक्रेनच्या वैमानिकाने सांताक्लॉजच्या वेशात विमानातून डागली क्षेपणास्त्रे...

रशिया असहाय्य का आहे?

एका विशेष संदेशाद्वारे रशियाचे ऊर्जा मंत्री म्हणाले की, 'पुतीन पाकिस्तानकडे (Pakistan) इस्लामिक जगत आणि दक्षिण आशियातील एक महत्त्वाचा भागीदार म्हणून पाहतात.' दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.

Shehbaz Sharif & Vladimir Putin
Russia-Ukraine War: युद्ध एकतर रशिया जिंकेल, नाहीतर जगाचा नाश होईल... पुतिन यांच्या गुरूचा दावा

शिवाय, शिष्टमंडळाचे स्वागत करताना शाहबाज शरीफ यांनी रशियासोबतचे संबंध किती महत्त्वाचे आहेत हे सांगितले. शहबाज शरीफ यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये समरकंदमध्ये पुतीन यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवणही सांगितली होती. ते पुढे म्हणाले की, या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com