White House Shooting: कोण होता व्हाइट हाऊसवर 30 राउंड फायर करणारा नासिर बेस्ट? स्वतःला समजायचा 'येशू ख्रिस्त'

Who is Nasire Best White House shooter: अमेरिकेची सत्ताकेंद्रे असलेल्या व्हाईट हाऊसच्या परिसरात शनिवारी संध्याकाळी गोळीबाराच्या एका मोठ्या घटनेने संपूर्ण अमेरिका हादरली आहे.
Who is Nasire Best White House shooter
Who is Nasire Best White House shooterDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेची सत्ताकेंद्रे असलेल्या व्हाईट हाऊसच्या परिसरात शनिवारी संध्याकाळी गोळीबाराच्या एका मोठ्या घटनेने संपूर्ण अमेरिका हादरली आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसबाहेर अचानक गोळ्यांचे आवाज ऐकू आले. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः व्हाईट हाऊसमध्ये हजर होते. त्यामुळे हा प्रकार ट्रम्प यांच्या सुरक्षेतील मोठी चूक मानला जात आहे. या घटनेनंतर तत्काळ कारवाई करत सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी केलेल्या जवाबी गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

३० राउंड फायर करणारा हल्लेखोर नेमका कोण?

'न्यूयॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, सीक्रेट सर्व्हिसच्या चेकपॉईंटजवळ गोळीबार करणाऱ्या या २१ वर्षीय बंदूकधाऱ्याची ओळख पटली आहे. त्याचे नाव नासिर बेस्ट असून तो मेरीलँडचा रहिवासी होता. स्वतःला 'इसा मसीह' (येशू ख्रिस्त) मानणाऱ्या नासिरने आयझेनहॉवर कार्यकारी कार्यालय इमारतीजवळ तब्बल ३० गोळ्या झाडून दहशत निर्माण केली. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात नासिर गंभीर जखमी झाला होता, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Who is Nasire Best White House shooter
Goa Accident Death: डिचोलीत भीषण अपघात! ट्रक आणि स्कूटरच्या धडकेत 42 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

गुन्हेगारी पार्श्वभूमी

अपुऱ्या माहितीमुळे या हल्ल्यामागील अधिकृत राजकीय हेतू अजून स्पष्ट झालेला नाही. मात्र, प्राथमिक तपासानुसार नासिर बेस्ट हा मानसिकदृष्ट्या विक्षिप्त होता. तो आधीपासूनच सीक्रेट सर्व्हिसच्या रडारवर होता. यापूर्वी जून आणि जुलै २०२५ मध्येही त्याने व्हाईट हाऊसच्या प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न केला होता, ज्यासाठी त्याला अटकही झाली होती. त्यावेळी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने "मला अटक व्हायची आहे" आणि "मीच ईसा मसीह आहे" अशी विचित्र विधाने केली होती. त्याच्यावर न्यायालयातून या क्षेत्रात येण्यास बंदी घालण्यात आली होती, परंतु त्याने या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले.

Who is Nasire Best White House shooter
Goa Crime: कुडणे खूनप्रकरणातील संशयिताला मुंबई येथून आणले गोव्यात, कोर्टाने दिली 10 दिवसांची पोलिस कोठडी; होणार सखोल चौकशी

राजकीय नेत्यांकडून हिंसेचा तीव्र निषेध

अध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या या थेट गोळीबारामुळे वॉशिंग्टनमध्ये तणावाचे वातावरण आहे. सीक्रेट सर्व्हिसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संशयिताने सुरक्षा चौकीवर उपस्थित एजंट्सच्या दिशेने गोळीबार केल्यानंतरच जवानांनी बचावात्मक पवित्रा घेत गोळ्या चालवल्या. दरम्यान, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत गेल्या काही आठवड्यांत निर्माण झालेली ही कितवीतरी चिंताजनक घटना आहे. या घटनेनंतर अमेरिकेतील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत राजकीय आणि सार्वजनिक हिंसेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com