Goa Accident Death: डिचोलीत भीषण अपघात! ट्रक आणि स्कूटरच्या धडकेत 42 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bicholim Accident Death: डिचोली तालुक्यातील नानोडा येथे गुरुवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक रस्ते अपघात घडला.
Goa Accident Death
Goa Accident DeathDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: नानोडा येथे गुरुवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. या अपघातात एका ४२ वर्षीय स्कूटर चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशांत केरकर असे मृत व्यक्तीचे नाव असून ते नानोडा येथीलच रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास प्रशांत हे आपल्या स्कूटरवरून जात असताना नानोडा भागात समोरून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांची समोरासमोर थेट टक्कर झाली.

उपचारापूर्वीच प्राण ज्योत मालवली

या भीषण धडकेमुळे प्रशांत केरकर हे स्कूटरवरून रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी आणि प्रवाशांनी तातडीने धाव घेतली.

गंभीर जखमी झालेल्या प्रशांत यांना रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुखापत अतिशय गंभीर असल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Goa Accident Death
Goa Crime: कुडणे खूनप्रकरणातील संशयिताला मुंबई येथून आणले गोव्यात, कोर्टाने दिली 10 दिवसांची पोलिस कोठडी; होणार सखोल चौकशी

पोलिसांकडून तपास सुरू

स्थानिक रहिवासी असलेल्या प्रशांत केरकर यांच्या या अचानक आणि अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण नानोडा आणि डिचोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केली असून, दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com