Goa Crime: कुडणे खूनप्रकरणातील संशयिताला मुंबई येथून आणले गोव्यात, कोर्टाने दिली 10 दिवसांची पोलिस कोठडी; होणार सखोल चौकशी

Kudne Murder Case Goa Suspect: चिकणे, कुडणे - साखळी येथील शैला संजय घाडी या महिलेचा खून करून पसार झालेल्या सावंतवाडी - महाराष्ट्र येथील सागर राऊळ याला ठाणे मुंबईत अटक केल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याला डिचोली पोलिस स्थानकात आणण्यात आले.
Kudne Murder Case Goa Suspect
Kudne Murder Case Goa SuspectDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: चिकणे, कुडणे - साखळी येथील शैला संजय घाडी या महिलेचा खून करून पसार झालेल्या सावंतवाडी - महाराष्ट्र येथील सागर राऊळ याला ठाणे मुंबईत अटक केल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याला डिचोली पोलिस स्थानकात आणण्यात आले. त्याला डिचोली प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता १० दिवस पोलिस कोठडीत देण्यात आली.

संशयित सागर राऊळ याने शैला यांच्यासमोर धाकट्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव फेटाळल्याने सागर याने थेट आईचाच काटा काढला. गेल्या १९ मे रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास हा खुनाचा प्रकार घडला होता.

Kudne Murder Case Goa Suspect
Goa Politics: 'आरजी' निर्नायकी; वीरेशचे अद्याप मौन, पुढील सूत्रे कुणाच्‍या हाती? कार्यकर्ते संभ्रमात, नेतृत्वाबाबत गूढ वाढले

खून करून फरार झालेल्या मळईवाडी, शिरशिंगे, सावंतवाडी महाराष्ट्र येथील सागर रमेश राऊळ या संशयिताला डिचोली पोलिसांनी वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या मीरा भाईंदर येथील गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांच्या सहकार्याने अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Telangana School Principal Murder Case
Nashik Live In Partner Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com