Turkey Earthquake: भारताने दिला तुर्कीला मदतीचा हात , NDRF पथकांकडून बचावकार्यात मदत

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जावीतहानी झाली आहे.
Turkey Earthquake
Turkey EarthquakeDainik Gomantak
Published on
Updated on

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी अनेक भूकंपाचे धक्के जाणावले. भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने असोसिएट प्रेसच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4000 वर पोहोचली आहे. सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. भारतातूनही तुर्कीसाठी मोठी मदत केली जात आहे. NDRF ची दोन पथकं प्रशिक्षित श्वान पथकासह तुर्कीमध्ये दाखल झाले आहे.

  • भुकंपामुळे मोठी जीवीतहानी

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठी जीवीतहानी झाली आहे. मृतांच्या आकडा 4000 वर पोहोचला आहे. एकापाठोपाठ एक सतत बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे येथील हजारो घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काढण्यासाठी शोध आणि बचाव पथक अथक प्रयत्न करत आहेत. या भूकंपामध्ये सुमारे 6000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

भारताने तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. प्रशिक्षित श्वानपथकासह एनडीआरएफच्या जवानांची दोन पथके आणि आवश्यक उपकरणे तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा भारताकडून (India) तुर्कीमध्ये पोहोचला आहे.

Turkey Earthquake
Punjab Politics: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी मंत्री साधू सिंह धरमसोत यांना अटक

यासोबतच भारताची पॅरोमेडिकल टीमही तुर्कीला पोहोचली आहे. हवामान बदलामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. तुर्कीमध्ये सोमवारी सकाळी मोठा भूकंपाचा धक्का बसला हा धक्का 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यानंतरही भूकंपाचे सत्र सुरुच होते, त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. तुर्कस्तानमधील काही भागात हवामानात अचानक बदल झाला आहे, ही चिंतेची बाब आहे. बर्फवृष्टी सुरू झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. बर्फवृष्टीमुळे ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना अधिक कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com