पाच वर्षांच्या याझिदीला गुलाम बनवले, साखळदंडांनी बांधून जीव घेतला; जर्मन महिलेला 14 वर्षांची शिक्षा

Germany Crime News: एका जर्मन महिलेने 5 वर्षांच्या याझिदीला गुलाम बनवले आणि तिला इराकमध्ये मरण्यासाठी पाण्याविना उन्हात सोडले.
Germany Crime News
Germany Crime News@PhilipGrant40
Published on
Updated on

Germany News: एका जर्मन महिलेने 5 वर्षांच्या याझिदीला गुलाम बनवले आणि तिला इराकमध्ये मरण्यासाठी पाण्याविना उन्हात सोडले. यासाठी या महिलेला 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयाला महिलेने आव्हान दिले होते. पण जर्मनीच्या फेडरल कोर्टाने नुकतेच महिलेचे अपील फेटाळून लावले. ही महिला आणि तिचा नवरा त्यावेळी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते.

दरम्यान, इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या जेनिफर डब्ल्यू नावाच्या या महिलेला ऑक्टोबर 2021 मध्ये गुलामगिरीच्या माध्यमातून मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसह इतर दोन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. सुरुवातीला तिला 10 वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु फेडरल कोर्ट ऑफ जस्टिसने या निर्णयाला स्थगिती दिली, कारण शिक्षेने मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांना कमी लेखले आणि महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या नाहीत.

Germany Crime News
Russia-Ukraine War: रशियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; कीववर एकाच वेळी डागली 31 क्षेपणास्त्रे

न्यायालयाने ते अपील निराधार ठरवत फेटाळले

यानंतर जेनिफरला पुन्हा शिक्षा देण्यासाठी सुनावणी सुरु झाली, जी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पूर्ण झाली. या सुनावणीनंतर तिला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या निर्णयाविरोधात जेनिफरने अपील केले होते, मात्र तिची याचिका पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत न्यायालयाने गेल्या बुधवारी फेटाळली होती. मात्र, महिलेने कोणत्या आधारावर अपील केले होते, हे निर्णयात स्पष्टपणे नमूद केलेले नाही.

Germany Crime News
Russia-Ukraine: लेकासाठी बाप व्याकूळ! युद्धात मृत्यू झालेल्या मुलाचे पार्थिव आणण्यासाठी कुटुंबीय रशियाला रवाना

मुलीला साखळदंडाने बांधले आणि आईलाही गुलाम बनवले

दरम्यान, या महिलेने ज्या मुलीला गुलाम बनवले होते, तिचे ऑगस्ट 2015 मध्ये इराकमधील फालुजा येथे निधन झाले होते. पहिल्या खटल्यात न्यायालयाला असे आढळून आले की, महिलेने मुलीला मदत करण्यासाठी काहीही केले नाही, मात्र ती तिला मदत करु शकली असती. महिलेच्या पतीने मुलीला अंगणात साखळदंडाने बांधले होते. आरोपी महिला आणि तिच्या पतीने याझिदीच्या आईलाही गुलाम बनवले होते.

या महिलेला 2021 मध्ये अंकारा येथे पकडण्यात आले होते

दुसरीकडे, जेनिफरला 2016 मध्ये अंकारा येथील जर्मन दूतावासातून ताब्यात घेऊन जर्मनीला पाठवण्यात आले होते. ती दूतावासात डॉक्युमेंट रिन्यू करण्यासाठी पोहोचली होती. तिचा पती इराकी नागरिक आहे. फ्रँकफर्ट न्यायालयाने त्याला नोव्हेंबर 2021 मध्ये नरसंहार, मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्ध गुन्ह्यांसह जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com