Russia-Ukraine: लेकासाठी बाप व्याकूळ! युद्धात मृत्यू झालेल्या मुलाचे पार्थिव आणण्यासाठी कुटुंबीय रशियाला रवाना

Russia-Ukraine War: कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, 23 वर्षीय हेमिल मंगुकिया हा युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्यासाठी मदतनीस म्हणून काम करत होता.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarDainik Gomantak

Indian Youth Died In Russia-Ukraine War:

रशियातील क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झालेल्या सुरतच्या हेमिल मांगुकियाचे वडील आणि अन्य दोन कुटुंबीय नुकतेच मॉस्कोला रवाना झाले. मांगुकिया यांच्या मृत्यूनंतर 20 दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचे पार्थिव पाहण्यासाठी मिळत आहे.

त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, 23 वर्षीय हेमिल मंगुकिया हा युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्यासाठी मदतनीस म्हणून काम करत होता. वडिलांनी सांगितले की, 21 फेब्रुवारीला त्यांना हेमिल मांगुकियाच्या मृत्यूची माहिती मिळाली. भारतीय तरुणांना नोकरीच्या बहाण्याने रशियाला पाठवणाऱ्या एजंट्सवर सीबीआयने यापूर्वीच कारवाई सुरू केली आहे.

मृत तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, मॉस्कोला जाण्यासाठी मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी सूरत ग्रामीण पोलिसात आपला जबाब नोंदवले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, तरुणांना फसवणाऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या दलालांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.

ते पुढे म्हणाले, "आम्ही मृतदेह भारतात आणण्याबाबत मॉस्कोमध्ये तैनात असलेल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की, ते मृतदेह भारतात परत पाठवतील. पण 18 दिवस उलटून गेले आहेत.

Russia Ukraine War
India-China: हास्यास्पद दावा करत पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल भेटीबाबत चीनकडून संताप

मृत तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, "प्रक्रिया कुठे अडकली आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. आता आम्ही थकलो आहोत आणि म्हणून आम्ही रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला तिथे जाऊन काय चालले आहे ते पहायचे आहे. आम्ही सुरतमध्ये आहोत."

तरुणाच्या कुटुंबियांना 16 दिवसांचा टूरिस्ट व्हिसा देण्यात आला आहे. मॉस्कोला पोहोचताच त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे ठरवले आहे.

Russia Ukraine War
Aseefa Bhutto Zardari: पाकिस्तानात बदलला रिवाज; मुलगी होणार देशाची 'फर्स्ट लेडी', कोण आहे आसिफा भुट्टो?

आम्हाला इथे पाहून रशियन अधिकारीही आमच्याबद्दल सहानुभूती दाखवतील आणि प्रक्रियेला गती देतील, अशी आशा हेमिल मंगुकियाच्या वडिलांनी व्यक्त केली.

मृताच्या भावाने सांगितले की, त्यांनी सूरतच्या सर्व आमदारांशी बोलले आणि त्यांनी लवकरच मृतदेह भारतात आणण्याचे आश्वासन दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com