Genevieve Lhermitte: या महिलेनं स्वत:च्या ५ मुलांची केलेली हत्या, १६ वर्षांनी त्याच दिवशी इच्छामरण

Genevieve Lhermitte
Genevieve LhermitteGomantak Digital
Published on
Updated on

Genevieve Lhermitte Case

पाच मुलांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या महिलेनं १६ वर्षांनी त्याच दिवशी मृत्यूला कवटाळलं. महिलेने इच्छामरणासाठी अर्ज केला होता. ‘मुलांना श्र्द्धांजली वाहण्यासाठी महिलेने त्याच मृत्यूला सामोरे जाण्याची इच्छा व्यक्त केली होती’, अशी माहिती महिलेच्या वकिलांनी दिली. १६ वर्षांपूर्वी या महिलेनं मुलांची हत्या केल्याची घटना समोर आली होती आणि या घटनेनं बेल्जियम हादरला होता.

Genevieve Lhermitte
Human Skin Jackets: कुछ भी...! ऑनलाइन विकले जातेय मानवी त्वचेपासून बनवलेले जॅकेट

बेल्जियममध्ये राहणाऱ्या जेनेव्हिव लेहमाईट या महिलेने २८ फेब्रुवारी २००७ मध्ये पाच मुलांची हत्या केली होती. ४० वर्षांच्या जेनेव्हिवला पाच मुलं होतं. यात चार मुली आणि एक मुलाचा समावेश होता.

काय घडलं होतं त्यादिवशी?

पती कामानिमित्त बाहेर गेला असताना जेनेव्हिवने दुकानातून दोन चाकू आणले. दुपारी जेवणानंतर घराचे दरवाजे बंद केले. यानंतर तिने पाचही मुलांची गळा चिरून हत्या केली. ‘मुलांमुळे घरात अडकून पडल्यासारखं वाटायचे. शेवटी हे टोकाचं पाऊल उचलले’, अशी कबुली तिने पोलीस चौकशीत दिली होती. जेनेव्हिव मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याने ती निर्दोष आहे, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी कोर्टात केला होता. मात्र, कोर्टाने हा दावा फेटाळून लावत जेनेव्हिवला २००८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Genevieve Lhermitte
Pakistan Crisis: पाक नेत्यांच्या मस्तीचा वेगळाच थाट, ट्विटरवर एकमेकांची काढतायेत खरडपट्टी

२०१९ मध्ये जेनेव्हिवला तुरुंगातून मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या कालावधीत तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर तिच्यावतीने इच्छामरणासाठी अर्ज करण्यात आला होता. डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या समितीने जेनेव्हिवच्या अर्जाला परवानगी दिली. ‘जेनेव्हिवची शारीरिक आणि मानसिक स्थिती खालावली होती. रुग्णानेही इच्छामरणासाठी अर्जा केला होता. वैद्यकीय अहवाल, मानसिक आजार याचा विचारमंथन केल्यानंतर जेनेव्हिवला इच्छामरणाची परवानगी देण्यात आली. जेनेव्हिवच्या इच्छेनुसार २८ फेब्रुवारोजी तिने जगाचा निरोप घेतला’, असे तिच्या वकिलांनी माध्यमांना सांगितले. मृत्यूसमयी जेनेव्हिव ५६ वर्षांची होती. १ मार्च रोजी जेनेव्हिवचे पार्थिव दफन करण्यात आले.

‘शेवटच्या श्वासापर्यंत मला शिक्षा मिळाली पाहिजे’

कोर्टातील सुनावणीदरम्यान जेनेव्हिवने सांगितले होती की, मी पाचही मुलांना गमावलं. त्यांच्या आयुष्यात ऐवढी वाईट गोष्टी घडायला नको हवी होती. मलाही आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्रास झाला पाहिजे. हीच माझ्यासाठी योग्य शिक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com