Human Skin Jackets: कुछ भी...! ऑनलाइन विकले जातेय मानवी त्वचेपासून बनवलेले जॅकेट

Jackets: त्याची किंमत जवळपास 60 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावर या जॅकेटसंबंधी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Jackets
JacketsDainik Gomantak
Published on
Updated on

Human Skin Jackets: ऑनलाइन बाजारात एक वादग्रस्त जॅकेट विकले जात आहे. दावा केला जात आहे की, ते 'मानवी त्वचेपासून' बनलेले आहे. त्याची किंमत जवळपास 60 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

सोशल मीडियावर (Social Media) या जॅकेटसंबंधी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एका यूजरने लिहिले की, हे जॅकेट विकणे लज्जास्पद आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, लोक नफ्यासाठी माणुसकी विसरत आहेत.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हे जॅकेट ऑनलाइन ऑर्डर केले जात असून ते बनवण्यासाठी तीन आठवडे लागतात. ज्या दुकानदाराने हे जॅकेट विकले त्याने त्याचे नाव सांगितले नाही, परंतु हे जॅकेट अशा प्रकारे बनवले आहे की, जणू ते मानवी त्वचेचे बनलेले आहेत. पण प्रत्यक्षात ते मानवी त्वचेपासून बनवलेले नव्हते.

Jackets
Viral Video: बदन पें सितारे लपटें हुए ओ... पाहा अनोखा फॅशन शो!

दरम्यान, या जॅकेटचे वर्णन 'ह्युमन स्किन जॅकेट' असे केले आहे. दुकानदाराला (Shopkeepers) सांगण्यात आले होते की, तुम्हाला जे जॅकेट बसेल ते आमच्याकडे पाठवा.

Jackets
Twitter पुन्हा बंद, टाईमलाइनवर नवे ट्विट दिसत नाहीये; मस्कची उडवली जातेय खिल्ली

अशा जॅकेटची कल्पना कुठून आली?

मानवी त्वचेसारख्या वस्तूपासून जॅकेट बनवण्याची कल्पना 1991 च्या एका चित्रपटातून घेण्यात आली आहे. ज्यामध्ये सीरियल किलर असेच जॅकेट बनवतो. फॉक्स लेदर जॅकेटचा विक्रेता म्हणतो की, त्यात एक अंतर्गत आणि एक बाह्य खिसा आहे.

Human Skin Jackets
Human Skin JacketsDainik Gomantak

तसेच, प्रत्येक वस्तू एका खास 'सिलिकॉन लेटेक्स लॅमिनेट'पासून बनवली जाते. जॅकेटची रचना अशी आहे की, ते पाहून कोणीही घाबरुन जाईल. जरी अनेक लोक ते बनवणाऱ्यांचे कौतुक करत आहेत. एका व्यक्तीने अनेक जॅकेटची ऑर्डरही दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com