Pakistan Crisis: पाक नेत्यांच्या मस्तीचा वेगळाच थाट, ट्विटरवर एकमेकांची काढतायेत खरडपट्टी

Pakistan Politics: आर्थिक मुद्द्यावरुन पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि सत्ताधारी पीएमएल-एनच्या वरिष्ठ उपाध्यक्षा मरियम नवाज यांच्यात ट्विटरवरुन जोरदार युद्ध सुरु झाले आहे.
Maryam Nawaz Sharif & Imran Khan
Maryam Nawaz Sharif & Imran KhanDainik Gomantak

infPakistan Politics: आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानमधील राजकीय गोंधळ थांबण्याच नाव घेत नाहीये. आर्थिक मुद्द्यावरुन पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि सत्ताधारी पीएमएल-एनच्या वरिष्ठ उपाध्यक्षा मरियम नवाज यांच्यात ट्विटर वॉर सुरु झाले आहे.

दोन्ही नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ले करत आहेत. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या खराब आर्थिक स्थितीसाठी शाहबाज शरीफ यांच्या सरकारला जबाबदार धरले. विशेष म्हणजे, त्यांनी शरीफ यांना गुन्हेगार ठरवले.

मरियम आणि इम्रान यांच्यात ट्विटरवर वॉर सुरु आहे

इम्रान खान (Imran Khan) यांनी हे सांगताच पीएमएल-एन नेत्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मरियम यांनी प्रत्युत्तर देत इम्रान खान यांना फटकारले. विशेष म्हणजे, त्यांनी त्यांना शांत बसण्यासही सांगितले. पाकिस्तानची आर्थिक दुर्दशा आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या करारावरुन दोन पाकिस्तानी नेत्यांमध्ये हे शाब्दिक वॉर सुरु झाले आहे.

Maryam Nawaz Sharif & Imran Khan
Pakistan Economic Crisis: वाघा बॉर्डरवरही पाकिस्तानच्या दिवाळखोरीचा परिणाम, पाक रेंजर्स...

इम्रान खान यांनी ट्विटवर लिहिले की, 'पीडीएमच्या नेतृत्वाखाली 11 महिन्यांत पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 62% किंवा 110 रुपयांपेक्षा जास्त घसरला आहे. पीडीएमच्या काळात हे कर्ज 14.3 लाख कोटींनी वाढले. महागाई (Inflation) (31.5%) 75 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.''

मरीयम म्हणाल्या - गप्प बसा

इम्रान खान यांच्या या ट्विटवर मरियम नवाज यांनी चोख प्रत्युत्तर दिले असून आज पाकिस्तान इम्रान खान यांच्या चुकांची शिक्षा भोगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मरियम यांनी इम्रान खान यांच्यासाठी कठोर शब्द वापरत ट्विट केले की, 'तुमची निर्दयी लूटमार, अकार्यक्षमता, चुकीचे प्राधान्यक्रम, IMF सोबतचा क्रूर करार आणि त्याचे उल्लंघन यामुळे हा देश आर्थिक संकटात ढकलला गेला आहे. आणि अशा लोकांची हिंमत बघा... तुम्ही पसरवलेली घाण साफ करणाऱ्यांना टार्गेट करत आहात. गप्प बसा...!'

Maryam Nawaz Sharif & Imran Khan
Pakistan Economic Crisis: 'कबर जितकी मोठी तितका जास्त कर', दिवाळखोर पाकिस्तानचं भयानक वास्तव

दुसरीकडे, मरियम नवाज यांनी आणखी एक ट्विट केले आहे. त्यात मरियम नवाज म्हणाल्या की, इम्रान खान पुन्हा सत्तेत येतील असे पाकिस्तानची जनता पुन्हा कधीही होऊ देणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com