Sheikh Rashid Video: इम्रान खान यांच्या रॅलीने ट्रॅफिक जाम, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले...

Sheikh Rashid Trolled: पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख सहयोगी शेख रशीद यांनी एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Sheikh Rashid
Sheikh RashidDainik Gomantak
Published on
Updated on

Sheikh Rashid Video: पाकिस्तानचे माजी मंत्री आणि इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख सहयोगी शेख रशीद यांनी एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून लोकांनी त्यांना लगेच ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

खरे तर, शेख रशीद यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि त्याचे श्रेय इम्रान खान यांच्या रॅलीत जमलेल्या गर्दीला दिले. मग तो व्हिडीओ काय होता... लोकांनी लगेचच पाहिला आणि व्हिडिओ लॉस एंजेलिसमधील ट्रॅफिक जामचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर इम्रान खान यांच्या पक्षाचे सहयोगी नेते शेख रशीद यांना सोशल मीडियावर चांगलचं ट्रोल करण्यात आले.

Sheikh Rashid
Imran Khan: अमेरिका मालक, पाकिस्तान भाड्याची बंदूक; इम्रान खान विरोधकांवर हल्लाबोल

रावळपिंडीतील मुरी रोडवर जमलेल्या लोकांचा व्हिडिओ सांगितला आहे

अवामी मुस्लीम लीगचे नेते शेख रशीद यांनी लॉस एंजेलिसमधील ट्रॅफिक जामची क्लिप पोस्ट केल्याचे लोकांना समजले तेव्हा त्यांनी त्यांची खरडपट्टी काढली. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे भाषण ऐकण्यासाठी रावळपिंडीतील मुरी रोडवर लाखो कार्यकर्ते जमा झाल्याचा पीटीआय नेत्याचा दावा सोशल मीडिया यूजर्संनी फेटाळून लावला.

Sheikh Rashid
Imran Khan Muder Attempt: 'इम्रान खान यांनी सरकार पाडण्याचा कट रचला...,' शाहबाज शरीफ यांचा पलटवार

व्हिडिओ कधीचा आहे?

लॉस एंजेलिसमधील ट्रॅफिक जामचा हा व्हिडिओ 5 वर्षे जुना आहे. अनेक युजर्संनी या जामचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचवेळी पीटीआय समर्थकांनी इम्रान खान यांच्या रॅलीचे फोटोही शेअर केले आहेत. इम्रान यांच्या रॅलीतही कमी गर्दी नव्हती हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिथेही लोकांची गर्दी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com