Imran Khan Muder Attempt: 'इम्रान खान यांनी सरकार पाडण्याचा कट रचला...,' शाहबाज शरीफ यांचा पलटवार

Imran Khan Muder Attempt: पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे.
Shahbaz Sharif And Imran Khan
Shahbaz Sharif And Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Imran Khan Muder Attempt: पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणावरुन वाद वाढत आहे. इम्रान खान यांनी या हल्ल्यासाठी देशातील विद्यमान शाहबाज सरकारला जबाबदार धरले आहे. आता शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले की, 'इम्रान खान खोटं बोलत आहेत. त्यांना आमचे सरकार पाडायचे आहे.' एवढेच नाही तर इम्रान खान यांच्यावर निशाणा साधताना शाहबाज सरकारने भारताविरुद्धही गरळ ओकली.

इम्रान यांच्या वक्तव्यावर भारत खूश

इम्रान खान (Imran Khan) यांच्या वक्तव्यावर भारत (India) खूश असल्याचे शाहबाज शरीफ म्हणाले. असे वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी एकदा विचार करायला हवा होता. त्यांनी इम्रान यांच्यावर खोटे बोलून आपले सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोपही केला. शाहबाज यांनी इम्रान खान यांच्याकडे आरोपांचे पुरावेही मागितले आहेत.

Shahbaz Sharif And Imran Khan
Imran Khan: हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी जनतेला केले संबोधित, 'सध्याचं सरकार...'

इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला

पाकिस्तानातील (Pakistan) वजिराबाद येथे गुरुवारी झालेल्या आंदोलनादरम्यान इम्रान खान यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. इम्रान खान यांनी शुक्रवारी पाकिस्तानी जनतेला संबोधित केले. लाहोरमधील (Lahore) शौकत खानुम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तिथून पाकिस्तानी जनतेला संबोधित करताना खान म्हणाले की, 'मला आधीच कळले होते की वजीराबाद आणि गुजरात दरम्यान कुठेतरी मला मारण्याची योजना होती.'

Shahbaz Sharif And Imran Khan
Imran Khan Attack Inside Story : इम्रान खान यांच्यावर हल्ला का झाला? हल्लेखोर म्हणाला...

दोन्ही पायात गोळ्या लागल्या

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्लाह आणि गुप्तचर संस्थेचे वरिष्ठ जनरल यांना या हल्ल्यासाठी जबाबदार धरले आहे. रॅलीत इम्रान खान यांना गोळी लागली. त्यानंतर त्यांना तात्काळ लाहोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दोन्ही पायात गोळ्या लागल्या आहेत. त्यांना बेशुद्धावस्थेत आणले तेव्हा त्यांच्या दोन्ही पायावर 16 जखमा असल्याचे रुग्णालयाने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com