Shehbaz Sharif & Nawaz Sharif
Shehbaz Sharif & Nawaz SharifDainik Gomantak

'भाईजान', नवाझ शरीफ यांना पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान झाले भावूक

प्रदीर्घ राजकीय संकटानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) वडील बंधू आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेण्यासाठी आज लंडनला पोहोचले.
Published on

प्रदीर्घ राजकीय संकटानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ वडील बंधू आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेण्यासाठी आज लंडनला पोहोचले. नवाझ शरीफ यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान भावूक झाले. हा क्षण पाहून नवाझ शरीफ यांनी मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडत त्यांच्या पाठीवर थाप मारुन प्रोत्साहन दिले. यानंतर भावूक झालेले शाहबाज शरीफ मागे जाऊन उभे राहिले. (The Prime Minister of Pakistan Shehbaz Sharif called on Nawaz Sharif)

दरम्यान, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या लंडन भेटीची माहिती देताना माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री मरियम औरंगजेब म्हणाल्या की, 'पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) पाकिस्तान (Pakistan) मुस्लिम लीग-नवाज (PML-N) च्या नेत्यांच्या गटाचा भाग असतील. पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ यांची भेट घेतील. त्या पुढे म्हणाल्या, पीएमएल-एनचे अध्यक्ष नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान खासगी दौऱ्यावर आहेत.'

Shehbaz Sharif & Nawaz Sharif
Pakistan: 'मला अटक केल्यास...,' इम्रान खान यांचा शाहबाज सरकारला इशारा

शिवाय, पीएमएल-एनचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांच्याशी सल्लामसलत करण्याच्या उद्देशाने ही वैयक्तिक भेट असल्याचे मरियम यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com