संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने आठ लाख डॉलर्स (सुमारे सहा कोटी 18 लाख 40 हजार 40 रुपये) दिले आहेत. भारताचे उप-स्थायी प्रतिनिधी आर. रवींद्र यांनी हा धनादेश यूएन विभागाच्या ग्लोबल कम्युनिकेशन विभागाच्या प्रभारी अधिकारी आणि उपसंचालक मीता होसाली यांना सुपूर्द केला. (India has provided eight lakh dollars to promote the use of Hindi in the United Nations)
दरम्यान, गुरुवारी एका ट्विटमध्ये ही माहिती देताना, संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनने लिहिले की, हिंदीच्या प्रचारासाठी भारताने (India) संयुक्त राष्ट्राला 8 दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिले आहे. भारत सरकार संयुक्त राष्ट्रांमध्ये (United Nations) हिंदीचा (Hindi) वापर वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे मिशनने म्हटले आहे.
दुसरीकडे, या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशनच्या भागीदारीत 2018 मध्ये UN (Hindi@UN) प्रोग्राम सुरु करण्यात आला, असे मिशनने म्हटले आहे. हिंदी भाषेत UN ची सार्वजनिक पोहोच वाढवणे आणि लाखो हिंदी भाषिक लोकांपर्यंत जागतिक समस्यांबद्दल जनजागृती करणे हा त्याचा उद्देश होता.
तसेच, भारत 2018 पासून युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ ग्लोबल कम्युनिकेशन्स (DGC) सोबत भागीदारी करत आहे. त्याचबरोबर DGC च्या बातम्या आणि हिंदी भाषेतील मल्टीमीडिया सामग्री एकत्र करत आहे.
याशिवाय, 2018 पासून, संयुक्त राष्ट्र संघाच्या बातम्या हिंदीमध्ये त्यांच्या वेबसाइट, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर सोशल मीडिया (Social Media) हँडलद्वारे प्रसारित केल्या जात आहेत. याशिवाय युनायटेड नेशन्स न्यूजचे हिंदी ऑडिओ बुलेटिन (UN Radio) दर आठवड्याला प्रसिद्ध केले जाते. त्याची वेबलिंक यूएन हिंदी न्यूज वेबसाइटवर उपलब्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.