Russia-Pakistan: अखेर पाकिस्तानने रंग दाखवला! डॉलरच्या लालसेपोटी दिला चीन-रशियाला धोका

Russia-Pakistan: अशी सर्व वादग्रस्त धोरणे अवलंबल्यामुळे पाकिस्तान सातत्याने चर्चेत असतो.
Envoys of China, Russia &Pakistan in Kabul to talks with Taliban government
Envoys of China, Russia &Pakistan in Kabul to talks with Taliban governmentDainik Gomantak
Published on
Updated on

Russia-Pakistan: पाकिस्तानने रशियाबरोबर असलेले मैत्रीपूर्ण संबंधाचा मान न ठेवता आय़एमएफकडून कर्ज मिळण्यासाठी अमेरिकेच्या म्हणण्यानुसार युक्रेनला हत्यारे पुरवण्याची माहीती समोर आली आहे. पोलंड आणि जर्मनीद्वारे मोठ्या प्रमाणात रॉकेट आणि टँक युक्रेनला पाठवण्यात आले आहेत.

पाकिस्तानचे म्हणणे काय?

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जहरा बलोच यांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. या माहितीला कोणताही आधार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. आयएमएफ आणि पाकिस्तानच्या कर्ज देण्याच्या बोलणीला वेगळा रंग देणे चूकीचे आणि धूर्तपणाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणतात- रशिया आणि युक्रेनच्या या युद्धात पाकिस्तानची भूमिका तटस्थतेची आहे. पाकिस्तानने रशिया किंवा युक्रेन कोणत्याच देशाला हत्यारे पुरविली नाहीत.

पाकिस्तानच्या बचावासाठी युक्रेन आला समोर

पाकिस्तानवर असे आरोप होत असताना आता युक्रेन पाकिस्तानच्या बचावासाठी समोर आला आहे. युक्रेनने हे स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानने आपल्याला कोणताही शस्रात्रांचा पुरवठा केला नाही.

रिपोर्ट काय सांगतात?

मिळालेल्या माहीतीनुसार, रशियाने पाकिस्तानला आधीच युक्रेनच्या हेतूविषयी सावध केल्याचे म्हटले जात आहे. शस्त्रांत्राचा पुरवठा होण्याआधी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दमयत्रो कुलेबा हे २० जुलैला अचानक पाकिस्तान दौऱ्यावर आले होते.

रशियाची पाकिस्तानला मदत

जेव्हा पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत होता तेव्हा रशिया मदतीला धावून आला होता. अनेक टन गहू रशियाने पाकिस्तानला पुरवला होता. त्याचप्रमाणे, भारताप्रमाणेच पाकिस्तानला स्वस्त तेलाचा पुरवठा केला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा

पाकिस्तान अशा प्रकारचा देश आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चर्चेत असतो. दहशतवादाला दिलेला पाठिंबा असो, देशातील अंतर्गत राजकीय परिस्थिती असो किंवा आर्थिक अस्थैर्यामुळे इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मागावी लागलेली मदत असो, रशियाला डावलून अमेरिकेबरोबर केलेली मैत्री असो किंवा अमेरिकेकडे दुर्लक्ष करत रशियाकडे मागितलेली मदत असो, भारताच्या अंतर्गत मुद्यावरुन भारताला धमकी देणे असो अशी सर्व वादग्रस्त धोरणे अवलंबल्यामुळे पाकिस्तान सातत्याने चर्चेत असतो.

Envoys of China, Russia &Pakistan in Kabul to talks with Taliban government
लंडन, दुबई अन् 700 कोटी; परदेशात घोटाळे करणाऱ्या 11 भारतीयांची इनसाइड स्टोरी

आता समोर आलेल्या माहीतीनंतर रशिया पाकिस्तानबाबत रशिया काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चीन, रशिया आणि अमेरिका या तीन बड्या राष्ट्रांकडून डॉलर कमावण्यासाठी पाकिस्तानने उचललेले हे पाऊल त्याच्यावरच उलटणार का हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

चीनदेखील यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.कारण चीनने खुलेपणाने रशियाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. पाकिस्तान चीनला आपला मित्रराष्ट्र म्हणून उल्लेख करतो. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान आता काय पाऊले उचलणार ? रशिया आणि चीनचे स्पर्धक राष्ट्र असलेल्या अमेरिकेबरोबर मैत्री करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com