Accusing Wife Of Adultery, Pakistani Man Along With Two Brothers Tied Her To A Tree And Stoned Her To Death: पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतात व्यभिचाराच्या आरोपावरून एका महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. लाहोरपासून ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबमधील राजनपूर जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी नुकतेच सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने पत्नीवर व्यभिचाराचा आरोप केला होता. पत्नीचे वय 20 वर्षे आहे. शुक्रवारी पत्नीवर व्यभिचाराचा आरोप करत त्याने दोन भावांसह तिला झाडाला बांधून दगडाने ठेचून ठार केले.
शुक्रवारी पती आणि त्याच्या दोन भावांनी महिलेला बेदम मारहाण केली. तिचा अमानुष छळ केला. यानंतर महिलेला झाडाला बांधून तिचा जीव जाईपर्यंत दगडाने मारले.
महिलेची हत्या करून आरोपी फरार झाले आहेत. ते पाकिस्तानातील (Pakistan) पंजाब आणि बलुचिस्तानच्या सीमावर्ती भागात लपले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. ही महिला राजनपूर येथील अल्कानी जमातीतील होती.
विशेष म्हणजे पाकीस्तानात (Pakistan) प्रतिष्ठेच्या नावाखाली महिलेची हत्या होण्याची ही पहिलीच घटना नाही. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे एक हजार महिलांची प्रतिष्ठेच्या नावाखाली हत्या केली जाते.
अशा खुनामागे अनेकदा कुटुंबीयांचा हात असतो. पीडितांनी स्वतःच्या इच्छेने लग्न करून किंवा नातेसंबंध जोडून त्यांच्या कुटुंबियांना लाज घालवल्याचे त्यांचे म्हणणे असते.
काही दिवसांपूर्वी पंजाबमधील मियांवली जिल्ह्यात एका तरुण महिला डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय डॉक्टरला तिच्या सहकाऱ्याशी लग्न करायचे होते, पण तिच्या वडिलांना ते मान्य नव्हते.
वडील मियांवली शहरातील महिलेच्या दवाखान्यात आले होते. लग्नाबाबत त्यांनी मुलीशी वाद घातला. यादरम्यान त्यांनी बंदूक काढून मुलीवर गोळी झाडली. गंभीर जखमी महिला डॉक्टरला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही.
काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातच (Pakistan) तीन महिन्यांची गरोदर फरजाना परवीन हिला तिच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकराशी तिच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्यामुळे विटा आणि दगड मारून ठार मारले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.