एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या जिवाशी खेळ! 167 कोटींच्या विमा घोटाळ्याचा पर्दाफाश, पर्यटकांच्या अन्नात कालवलं विष; 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Mount Everest Insurance Scam 2026: जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या जिवाशी खेळणारा एक धक्कादायक विमा घोटाळा नेपाळमध्ये उघडकीस आला.
Mount Everest Insurance Scam 2026
Mount EverestDainik Gomantak
Published on
Updated on

Mount Everest Insurance Scam 2026: जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या जिवाशी खेळणारा एक धक्कादायक विमा घोटाळा नेपाळमध्ये उघडकीस आला. 'काठमांडू पोस्ट'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सुमारे 20 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 167 कोटी रुपयांचा विमा लाटण्यासाठी पर्यटकांच्या जेवणात चक्क विषारी पदार्थ किंवा बेकिंग सोडा मिसळल्याचा खळबळजनक आरोप शेरपांवर करण्यात आला. या संघटित गुन्हेगारीप्रकरणी नेपाळ पोलिसांनी ट्रेकिंग कंपन्यांचे मालक, हेलिकॉप्टर ऑपरेटर्स आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांसह 32 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवला जात होता. ट्रेकिंग एजन्सींशी हातमिळवणी केलेले शेरपा मुद्दाम गिर्यारोहकांच्या अन्नात 'बेकिंग सोडा' मिसळत असत. हा सोडा पोटात गेल्यावर पर्यटकांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबासारख्या गंभीर समस्या सुरु होत असत. या आजाराची लक्षणे हुबेहूब 'अल्टीट्यूड सिकनेस' (उंचीवर गेल्यावर होणारा त्रास) किंवा 'फूड पॉइजनिंग' सारखी दिसत असल्याने पर्यटक घाबरुन जात.

Mount Everest Insurance Scam 2026
Nepal PM Oath Ceremony: नेपाळमध्ये 'बालेन' युगाचा उदय! रॅपर ते PM... बालेंद्र शाह यांनी घेतली 47 वे पंतप्रधान म्हणून शपथ

एकदा का पर्यटक आजारी पडला की, त्याला भीती घालून महागड्या इमर्जन्सी हेलिकॉप्टर रेस्क्यूसाठी तयार केले जाई. त्यानंतर हेलिकॉप्टर ऑपरेटर्स बनावट वैद्यकीय अहवाल आणि उड्डाणाची खोटी कागदपत्रे तयार करुन आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपन्यांकडून लाखो रुपयांचे क्लेम वसूल करत असत.

या घोटाळ्यातून मिळणारी अवैध कमाई शेरपा, हेलिकॉप्टर कंपन्या, ट्रेकिंग एजन्सी आणि ज्या रुग्णालयांमध्ये पर्यटकांवर उपचार झाल्याचे दाखवले जायचे, त्या रुग्णालयांमध्ये वाटली जात असे. तपासणीत असे समोर आले आहे की, तीन प्रमुख माउंटेन रेस्क्यू फर्म्सनी मिळून सुमारे 19.69 दशलक्ष डॉलर्सची फसवणूक केली. एका कंपनीने तर आपल्या 1248 रेस्क्यू दाव्यांपैकी 171 दावे पूर्णपणे बनावट असल्याचे मान्य केले असून, त्याद्वारे 10 दशलक्ष डॉलर्सहून अधिकची अवैध कमाई केली.

Mount Everest Insurance Scam 2026
Nepal Interim PM: सुशीला कार्की यांनी रचला इतिहास, बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान VIDEO

दुसऱ्या कंपनीवर 8 दशलक्ष डॉलर्स आणि तिसऱ्या कंपनीवर 1 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. आता नेपाळचे सरकारी वकील या कंपन्यांकडून सुमारे 11.3 दशलक्ष डॉलर्सचा दंड वसूल करण्याच्या तयारीत आहेत.

नेपाळच्या पर्यटन उद्योगासाठी हा घोटाळा अत्यंत मानहानीकारक ठरला, कारण या क्षेत्रावर तेथील 10 लाखांहून अधिक लोकांचा रोजगार अवलंबून आहे. या वाढत्या फसवणुकीमुळे अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी नेपाळमध्ये ट्रेकिंग करणाऱ्या पर्यटकांचा विमा उतरवणे बंद केले. जरी नेपाळ सरकारने 2018 मध्ये मध्यस्थांना हटवून रेस्क्यू प्रक्रिया कडक करण्याचा प्रयत्न केला, तरीही ठोस कारवाई आणि कठोर शिक्षेअभावी हा काळा धंदा फोफावत राहिला.

Mount Everest Insurance Scam 2026
Nepal Protest: राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, गृहमंत्र्यांच्या घराला लावली आग! नेपाळमध्ये राडा सुरुच; PM ओली सोडणार देश?

नेपाळच्या संघटित गुन्हेगारी विभागाचे प्रमुख मनोज कुमार केसी यांनी म्हटले की, जेव्हा अशा गंभीर गुन्ह्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जात नाहीत, तेव्हा ते अशा प्रकारे वाढतात आणि हा इन्शुरन्स स्कॅम त्याचाच परिणाम आहे. आता या 32 जणांवर काय कारवाई होते, याकडे जगाचे लक्ष लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com