Israel-Hamas War: '...तर पुढचा नंबर युरोप असेल', नेतान्याहू यांनी युद्धादरम्यान 80 राजदूतांना दिला इशारा

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्यापासून घनघोर युद्ध सुरु आहे.
Benjamin Netanyahu
Benjamin NetanyahuDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, हमाससोबतच्या युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला की, यापुढचा नंबर युरोपचा असेल. नेतन्याहू म्हणाले की, हमासविरुद्धचे सध्याचे युद्ध सभ्यता आणि बर्बरता यांच्यात लढले जात आहे. दहशतवादाच्या या मोहिमेत मध्यपूर्वेचा पराभव झाला तर यापुढचा नंबर युरोप असेल.

दरम्यान, इस्रायल-हमास युद्धादरम्यान सोमवारी इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये 80 देशांच्या राजदूतांना संबोधित करताना नेतान्याहू म्हणाले की, ''त्यांचा देश इराणच्या नेतृत्वाखालील दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढ्यात गुंतला आहे. जर मध्य पूर्वेतील देश या लढाईत पडले तर यापुढचा नंबर युरोपचा असेल."

Benjamin Netanyahu
Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धादरम्यान PM मोदींचा मोठा पुढाकार, इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरुन केली चर्चा

लढाई स्थानिक नसून जागतिक आहे.

नेतन्याहू पुढे म्हणाले की, "ही स्थानिक लढाई नसून जागतिक लढाई आहे. या धुरीला पराभूत करणे ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे. आम्ही गाझामध्ये हमासविरुद्ध लढा देत आहोत. आम्ही हमासचा पराभव करु, आम्ही हमासचा (Hamas) नायनाट करु. ही लढाई आम्ही नक्कीच जिंकू... आम्हाला विश्वास आहे की, सर्व सुसंस्कृत शक्तींनी आम्हाला या युद्धात साथ दिली पाहिजे कारण ही लढाई आपल्या सर्वांची असून विजयही सर्वांचा असेल.''

चांगल्या भविष्याचे वचन

नेतान्याहू म्हणाले की, “त्यांना मध्य पूर्व आणि जगाला अंधकारात ढकलून द्यायचे आहे. त्यांना शांततेच्या दिशेने होणारी कोणतीही प्रगती आणि अरब देशांसोबतच्या आमच्या नवीन शांतता करारांमध्ये झालेली प्रगतीमध्ये ख्योडा घालायचा आहे. पण आम्ही गाझा आणि संपूर्ण मध्यपूर्वेतील लोकांना नवीन भविष्य देऊ इच्छितो.''

यापूर्वी, रविवारी नेतान्याहू म्हणाले होते की जोपर्यंत दहशतवादी गट (हमास) इस्रायली ओलीसांना सोडत नाही तोपर्यंत इस्रायल हमाससोबत कोणत्याही युद्धविरामास सहमत नाही. गेल्या महिन्यात 7 ऑक्टोबरला हमासने दक्षिण इस्रायलवर हल्ला करुन 1,400 लोकांना ठार केले, तर 240 लोकांना गाझामध्ये ओलिस ठेवले.

Benjamin Netanyahu
Israel-Hamas War: हमास प्रमुख आणि पाकिस्तानी नेत्याची खलबतं; पॅलेस्टाईनची काश्मीरशी तुलना करत...

ओलीसांना सोडल्याशिवाय युद्धविराम नाही

“ओलिसांना परत केल्याशिवाय युद्धविराम होणार नाही,” असे पंतप्रधान नेतन्याहू यांनी रॅमन एअर फोर्स बेसच्या भेटीदरम्यान स्पष्टपणे सांगितले. युद्धविरामसारखा शब्द शब्दकोशातून पूर्णपणे काढून टाकला पाहिजे.

आम्ही आमच्या मित्रांना आणि आमच्या शत्रूंना हे सांगू इच्छितो की, जोपर्यंत आम्ही त्यांचा पराभव करत नाही तोपर्यंत आम्ही गाझावर हल्ला करत राहू. आमच्याकडे पर्याय नाही, असेही ते पुढे म्हणाले.

नेतान्याहू ज्या 'दहशतवादाच्या धुरी'चा उल्लेख करत आहेत, त्याचे नेतृत्व इराणकडे आहे. त्यात इराणसमर्थित हमास, हिजबुल्ला आणि हौथी बंडखोरांचा समावेश आहे, जे सध्या इस्रायलवर हल्ला करत आहेत. 'दहशतवादाच्या धुरी'मध्ये मध्यपूर्वेनंतर युरोपकडे (Europe) डोळे लावून बसलेल्या 3H चे कनेक्शन यावेळी बोलताना नेतन्याहू यांनी सांगितले. त्यांनी जगातील सर्व देशांना 'दहशतवाद' संपवण्यासाठी इस्रायलला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com